आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी एक संघ किती खेळाडूंना रिटेन करू शकेल, यावर घमासान जारी आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, फ्रँचायझींना 6 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळू शकते. अशा परिस्थितीत, याचा काही संघांना फायदा होईल, तर काही संघांना फटकाही बसू शकतो. बऱ्याच संघांमध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत, ज्यामुळे या निर्णयाचा त्यांना फायदा होऊ शकतो. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 3 संघांबद्दल सांगणार आहोत.
(1) चेन्नई सुपर किंग्ज – बीसीसीआयनं 6 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिल्यास चेन्नई सुपर किंग्जला याचा मोठा फायदा होऊ शकतो. आयपीएल 2024 मध्ये जरी सीएसकेची कामगिरी तितकी चांगली राहिली नाही, तरी त्यांच्याकडे अनेक चांगले खेळाडू आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये संघ रवींद्र जडेजा, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांना रिटेन करू शकतो. याशिवाय एमएस धोनीला चौथा खेळाडू म्हणून रिटेन करण्याचा पर्यायही खुला होणार आहे. याशिवाय सीएसके विदेशी खेळाडूंमध्ये मथिशा पाथिराना आणि महिश तिक्ष्णा यांना रिटेन करू शकतो. यामुळे त्यांची कोअर टीम अबाधित राहील.
(2) सनराईजर्स हैदराबाद – सनरायझर्स हैदराबादनं गेल्या हंगामात फायनल पर्यंत मजल मारली होती. त्यांनाही त्यांचे जास्तीत जास्त खेळाडू कायम ठेवायचे आहेत. कर्णधार पॅट कमिन्सशिवाय सनरायझर्स हैदराबाद ट्रॅव्हिस हेडला रिटेन करू शकतो. याशिवाय भुवनेश्वर कुमार, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या भारतीय खेळाडूंनाही कायम ठेवता येईल. जरी संघ हेनरिक क्लासेनला रिटेन करू शकला नाही, तरी त्यांच्याकडे एक चांगला संघ असेल.
(1) कोलकाता नाइट रायडर्स – 6 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा कोलकाता नाईट रायडर्सला होऊ शकतो. आयपीएल 2024 चा विजेता हा संघ आपल्या सर्वोत्तम खेळाडूंना कायम ठेवू शकतो. 6 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी मिळाल्यास केकेआर आधी आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांना कायम ठेवेल. यानंतर रिंकू सिंह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि श्रेयस अय्यर यांना कायम ठेवता येईल.
हेही वाचा –
मेगा लिलावापूर्वी एक संघ इतक्या खेळाडूंना रिटेन करू शकेल! समोर आलं मोठं अपडेट
“आपल्या देशात फक्त क्रिकेटलाच प्राधान्य…”, पॅरिस ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीनंतर सायनाने व्यक्त केली खदखद
मोठी अपडेट! ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया करणार विशेष सराव