fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खालच्या फळीत खेळणारे ३ खेळाडू, जे पुढे जाऊन बनले टीम इंडियाचे धुव्वांदार सलामीवीर

3 Indian Batsman Become Opener After Playing In Lower Order

क्रिकेट इतिहासात कसोटी, वनडे आणि टी२० अशा ३ स्वरुपांची टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली. कसोटीसारख्या अमर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना वनडे क्रिकेटला समजून घ्यायला थोडा वेळ लागला. परंतु, त्यांनी स्वत:च्या फलंदाजी आणि गोलंदाजी कौशल्यात बदल करुन भारताला पहिले वनडे विश्वचषक जिंकून दिले. त्याप्रमाणेच वनडेत खेळणाऱ्या दुसऱ्या पिढीने दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोष्टी शिकल्या आणि नव्या टी२० क्रिकेटमध्येही आपली कर्तबगारी दाखवली.

ज्याप्रकारे भारतीय क्रिकेटने वेळेनुसार क्रिकेटच्या तिन्ही क्षेत्रात आपली दहशत निर्माण केली. त्याप्रमाणेच  भारतीय संघातील काही फलंदाजांनी त्यांच्यामध्ये खूप बदलाव केले आहेत. मधल्या फळीतून सलामीवीराची जागा मिळवणाऱ्या फलंदाजांना कदाचित एवढी मेहनत करावी लागत नसेल. जेवढी खालच्या फळीतील फलंदाजांना सलामीचे स्थान मिळवण्यासाठी करावी लागत असेल.

आश्चर्याची गोष्ट ही आहे की, आपल्या कारकिर्दीची सुरुवात खालच्या फळीतून करुन पुढे भारतीय संघातील सलामीवीराचे स्थान मिळवणाऱ्या फलंदाजांची नावे खूप विशेष आहेत. त्यांच्याविषयी कोणीही विचार करु शकत नाही की, या फलंदाजांनी एकेकाळी खालच्या फळीत फलंदाजी केली असेल.

तर जाणून घेऊया, कोण आहेत ते फलंदाज जे खालच्या फळीतील फलंदाजांपासून पुढे महान सलामीवीर फलंदाज बनले.

3 Indian Batsman Become Opener After Playing In Lower Order

१. सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे. त्याने नोव्हेंबर १९८९ला पाकिस्तानविरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या सामन्यात त्याला ६व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यावेळी तो फक्त १५ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर पुढे ४ वर्षे त्याला भारतीय संघाकडून मधल्या किंवा खालच्या फळीत फलंदाजी करावी लागली.

परंतु, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सचिनला सलामीला फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी संधीचा पूरेपूर फायदा घेत त्याने ४९ चेंडूत ८२ धावांची खेळी केली होती. तेव्हापासून सचिन संघातील सलामीवीर फलंदाज बनला आणि क्रिकेटविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

२. विरेंद्र सेहवाग

भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागला कारकिर्दीच्या सुरुवातीला फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्याला भारतीय संघाकडून खालच्या फळीत फलंदाजी करावी लागत असायची. १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यातून सेहवागने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या सामन्यात त्याला ७व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते आणि तो शोएब अख्तरच्या २ चेंडूत १ धाव करुन बाद झाला होता.

त्यामुळे सेहवागला पुढे ११ सामन्यात खालच्या फळीत फलंदाजी करावी लागली. मात्र, १२व्या सामन्यात त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीचा पूरेपूर लाभ उठावला. पुढे जाऊन सेहवाग आणि सचिनच्या सलामीवीर जोडीने भारताला कित्येक सामने जिंकून दिले.

३. रोहित शर्मा

हिटमॅन रोहित शर्मा गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय संघातील सलामीवीर फलंदाजाची भूमिका सांभाळत आहे. मात्र, या फलंदाजाने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खालच्या फळीत फलंदाजी केली होती. २००७मध्ये आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून रोहितने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढे ४ वर्षे तो भारतीय संघातील खालच्या फळीतील फलंदाज होता.

परंतु, तत्कालिन कर्णधार एमएस धोनीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहितला सलामीला फलंदाज करण्यास पाठवले होते. मात्र, या सामन्यात त्याला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. परंतु, पुढील इंंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही सलामीला फलंदाजी करत रोहितने आपले फलंदाजी कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली. सलामीला फलंदाजी करताना केवळ १६ डावात त्याने ५८० धावा केल्या. आता रोहित क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर फलंदाज आहे.

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमधील ‘हे’ ३ खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात टी२०…

जागतिक क्रिकेटमधील ७ सर्वात आळशी क्रिकेटपटू; २ नावे आहेत भारतीय…

हे २ भारतीय खेळाडू, त्यांच्या टी२० कारकिर्दीत एकदाही झाले नाहीत शून्यावर बाद

You might also like