fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जागतिक क्रिकेटमधील ७ सर्वात आळशी क्रिकेटपटू; २ नावे आहेत भारतीय…

Most Laziest Cricketers in the World

क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ, फीटनेस चांगली असेल तेव्हाच तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. याउलट जर तुमची फीटनेस चांगली नसेल, तर तुम्हाला कोणत्याच खेळामध्ये चांगली कामगिरी करता येणार नाही तसेच ऍक्टिव्हदेखील राहता येणार नाही.

आता जर क्रिकेटबद्दल चर्चा करायची म्हटलं, तर जगभरातून पसंती मिळणाऱ्या क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना पाहून असे म्हणणे चूकीचे ठरणार नाही की, त्यांची चपळता बिबट्याप्रमाणे आहे. तसेच असेही काही खेळाडूदेखील आहेत, जे आवश्यकतेपेक्षा अधिक आळशी आहेत.

चला तर मग जाणून घेऊया जागितक क्रिकेटमधील त्या ७ क्रिकेटपटूंविषयी, जे खूप आळशी आहेत आणि त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला आहे.

जागतिक क्रिकेटमधील सर्वात आळशी असलेले ७ क्रिकेटपटू- 7 Most Laziest Cricketers in the World.

१. सरफराज अहमद

या यादीत सर्वात पहिले नाव पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमदचे (Sarfaraz Ahmed) आहे. सरफराझला सर्वात आळशी आम्ही-तुम्ही म्हणत नसून हे त्याने स्वत: सिद्ध केले आहे.

आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये सरफराजचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये क्रिकेट चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले होते. संपूर्ण विश्वचषकात तो आळश देताना दिसत होता. त्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, सरफराज सामन्यादरम्यान यष्टीरक्षण करताना जांभई देत होता.

सरफराजच्या या कृत्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला होता. याव्यतिरिक्त मेगा इव्हेंटदरम्यान त्याच्या खराब यष्टीरक्षणाबद्दही त्याला चांगलेच फटकारले होते. तो संघात ऊर्जा निर्माण होण्यासाठी चेहऱ्यावर उत्साहदेखील दाखवत नव्हता.

२. मोहम्मद शहजाद

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजादचादेखील (Mohammad Shahzad) त्या खेळाडूंच्या यादीत समावेश होतो, ज्यांना विश्वचषकातील आपल्या खेळीबरोबरच आळशी स्वभावासाठीही ओळखले जाते.

वजनदार शरीरयष्टी असणाऱ्या शहजादने आतापर्यंत अफगाणिस्तान संघासाठी ८४ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३३.६६ च्या सरासरीने २७२७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने २ कसोटी सामन्यात राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु शहजाद अनफीट खेळाडूंच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे.

अधिक वजन असणाऱ्या शहजादला खेळपट्टीवर धावा घेण्यास समस्या येते. त्यामुळे तो कमी धावा पळून घेतो. परंतु शहजाद एक चांगला यष्टीरक्षकही आहे. कारण त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८४ वनडे सामन्यात २५ वेळा यष्टीचित केले आहे आणि ६४ झेल घेतल्या आहेत.

३. ख्रिस गेल

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलला (Chris Gayle) जागतिक क्रिकेटमध्ये ‘युनिव्हर्सल बाॅस’ या नावाने ओळखले जाते. मोठ-मोठे षटकार ठोकणाऱ्या गेलचे नाव सर्वात आळशी व्यक्तींच्या यादीत सामील आहे. कारण तो चौकार- षटकार तर ठोकतो. परंतु त्याला १ किंवा २ धाव घेणे आवडत नाही.

गेल जेव्हाही मैदानावर उतरतो, तेव्हा त्याच्या चाहत्यांना त्याचे चौकार-षटकार पहायला खूप आवडते. परंतु त्याला धावणे खूप जास्त आवडत नाही. त्यामुळे गेलला आळशी खेळाडू म्हटले तर त्यात काही वावगं ठरणार नाही.

यामागील कारण असे की, गेल एक चांगला यष्टीरक्षक नाही आणि तो यष्टीरक्षणामध्ये जास्त आवडही दाखवत नाही. गेलचा उद्देश्य केवळ मैदानावर येऊन गोलंदाजांविरुद्ध विस्फोटक फलंदाजी करणे आणि संघासाठी धावा करणे एवढेच असते.

४. केदार जाधव

भारतीय संघात एकीकडे विराट कोहली (Virat Kohli), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांसारखे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत, तर दुसरीकडे केदार जाधवसारख्या (Kedar Jadhav) खेळाडूचाही समावेश आहे. जाधव वनडे क्रिकेटमध्ये अष्टपैलू क्रिकेटपटूची भूमिकाही बजावतो.

जाधवने भारताकडून आतापर्यंत ७३ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या आहेत. जाधवला आळशी म्हणण्यामागील कारण असे की, तो मैदानावर अधिक उत्साही दिसत नाही. तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू असूनही त्याचा उत्साह मैदानावर तेवढा जास्त नसतो.

असे नाही की त्याची फीटनेस कमी आहे. परंतु तो क्षेत्ररक्षणादरम्यान इतर भारतीय खेळाडूंच्या तुलनेत कमी उत्साही दिसतो.

५. शेन वॉर्न

ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज शेन वॉर्नने (Shane Warne) फलंदाजांना खूपच चिंतेत पाडले आहे. परंतु असे असले तरीही जगातील आळशी खेळाडूंच्या यादीत त्याच्या नावाचाही समावेश आहे.

वॉर्नला त्याच्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीव्यतिरिक्त मैदानावर आपल्या आळशी स्वभावासाठीही ओळखले जाते. मग ते खेळपट्टीवर धावणे असो किंवा मैदानावर क्षेत्ररक्षण करणे असो वॉर्नला धावणे फारसे आवडत नाही.

वॉर्न अनेक वेळा आपल्या गोलंदाजी ऍक्शनमध्येही नेहमीप्रमाणे धाव घेण्याऐवजी हळूवार चालत चेंडू फेकत असायचा. वॉर्न ज्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता, त्यामध्ये रिकी पाँटिंगसारख्या (Ricky Ponting) काही सर्वोत्तम क्षेत्ररक्षक होता.

६. मुनाफ पटेल

सध्याच्या काळात भारतीय खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खूप सुधारणा झालेली पहायला मिळाली आहे. परंतु मैदानावरील क्षेत्ररक्षणामध्ये सध्याही भारतीय संघात खूप सुधारणेची आवश्यकता आहे. पुर्वीचे खराब क्षेत्ररक्षणाचे सर्वात योग्य उदाहरण म्हणजे मुनाफ पटेल (Munaf Patel) होय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरवात केल्यानंतरपासून त्याचा आळशीपणा वाढत गेला. तो मैदानावर नेहमीच चेंडूच्या मागेच धावताना दिसला. त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या वेगातही घट होत गेली. भारताचा हा माजी दिग्गज खेळाडू आपल्या आळशी स्वभावासाठी चर्चेत होता.

७. इंझमाम उल हक

पाकिस्तानचा उत्कृष्ट फलंदाज इंझमाम उल हकला (Inzamam Ul Haq) मैदानावर धावणे कधी आवडत नव्हते, हे सर्वांनाच माहित आहे. वनडे सामन्यामध्ये धावबाद होणे ही त्याची साक्ष देतात.

मैदानावरील क्षेत्ररक्षणादरम्यानही तो नेहमी चेंडूच्या मागेच धावत असायचा किंवा मग उतर क्षेत्ररक्षकांना चेंडू पकडण्याचा इशारा करताना दिसत होता.

You might also like