क्रिकेटने जगभरातील लोकांच्या मनावर आपले वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे क्रिकेटमधील छोट्या-मोठ्या विक्रमांनादेखील खूप महत्त्व दिले जाते. क्रिकेटमधील असाच एक नकोसा विक्रम म्हणजे, ‘नर्वस नाइंटीज’ वर बाद होणे…
नर्वस नाइंटीज म्हणजे काय?
नर्वस नाइंटीज म्हणजे कोणताही फलंदाज ९० ते ९९ धावांवर बाद होतो. तसं पाहिलं तर, वनडेत ९०-९९ धावांवर बाद होण्याचे दु:ख हे वेगळेच असते. कारण, वनडेत शतक करणे ही खूप कठीण गोष्ट असते आणि शतकाच्या एवढ्या जवळ असताना फलंदाज बाद झाल्यामुळे त्याची शतकी खेळी पूर्ण करण्याचे स्वप्न अधुरे राहते.
नर्व नाइंटीज बद्दल थोडी मजेशीर माहिती-
वनडेत भारताचे तब्बल २६ फलंदाज एकदातरी नर्व नाइंटीजमध्ये बाद झाले आहेत. समीर दिघे हे ९४ धावांवर नाबाद राहिले. त्यांना क्रिकेट कारकिर्दीत कधीही कसोटी किंवा वनडेत शतकी खेळी करता आली नाही. पार्थिव पटेल हा वनडेत ९५ धावांवर बाद झाला होता. त्यालाही कधीही कसोटी किंवा वनडेत शतकी खेळी करता आलेली नाही.
या लेखात वनडेत सर्वाधिकवेळा नर्वस नाइंटीजचा शिकार झालेल्या ३ भारतीय फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. तर बघूयात कोण आहेत ते ३ भारतीय खेळाडू- 3 Indian Batsman Who Out Most Times On 90-99 Runs in Odi
सचिन तेंडुलकर – १८ वेळा
वनडे क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ४९ शतके केली आहेत. या शतकांची नक्कीच ५०च्या खूप पुढे गेली असती, जर सचिन नर्वस नाइंटीजचा शिकार बनला नसता. वनडेत १८ हजारपेक्षा जास्त धावा करणारा सचिन हा त्याच्या २३ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत तब्बल १८वेळा ९०-९९ धावांवर बाद झाला आहे. यासह तो केवळ भारतातील नव्हे तर जगातील सर्वाधिक वेळा ९०-९९ धावांवर बाद होणारा फलंदाज ठरला आहे.
सचिन ९९वर तीन वेळा, ९८वर एक, ९७वर दोन, ९५ वर दोन, ९४ वर १, ९३वर पाच, ९१वर दोन व ९० वर एकदा बाद झाला आहे, तर ९६वर एकदा श्रीलंकेविरुद्ध कटकला नाबाद राहिला आहे.
विशेष म्हणजे, सचिनव्यतिरिक्त जगातील कोणताही फलंदाज १०पेक्षा जास्त वेळा वनडेत नर्वस नाइंटीजवर बाद झालेला नाही.
२. मोहम्मद अझरुद्दीन – ७ वेळा
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने त्याच्या वनडे कारकिर्दीत केवळ ७ शतके केली होती. विशेष म्हणजे, अझरुद्दीन ७ वेळा शतकाच्या जवळ असताना म्हणजे ९०-९९ धावांवर बाद झाला आहे. यासह वनडेत नर्वस नाइंटीजचा सर्वाधिक वेळा शिकार होणारा तो दुसरा भारतीय फलंदाज आहे. आपल्या १५ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत अझरुद्दीनने ३६.५२च्या सरासरीने तसेच ७ शतके व ५८ अर्धशतकांच्या मदतीने ९३७८ धावा केल्या होत्या. शिवाय तो वनडेत ५४वेळा नाबाद राहिला आहे.
३. विराट कोहली – ६ वेळा
भारताचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक आहे. तो सचिननंतर वनडेत सर्वाधिक शतक मारणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने वनडेत आतापर्यंत एकूण ४३ शतके केली आहेत. परंतु, वनडेत ६वेळा ९०-९९ धावांवर बाद होण्याचा नकोसा विक्रमदेखील त्याच्या नावावर आहे. यासह तो नर्वस नाइंटीजवर बाद होणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे. विराटने आतापर्यंत वनडेत ५८ अर्धशतके करत एकूण ११८६७ धावा केल्या आहेत.
६ वेळा वनडेत नर्व नाइंटीजमध्ये बाद होणार इतर भारतीय फलंदाज
विराटसोबत विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि सौरव गांगुली हेदेखील वनडेत ६ वेळा नर्वस नाइंटीजचा शिकार बनले आहेत.
तर, मर्यादित षटकांचा सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक रोहित शर्मा हा ५ वेळा ९०-९९ धावांवर बाद झाला आहे.
ट्रेंडिंग लेख-
वनडे सिरीजमध्ये षटकारांचा पाऊस पाडणारे ५ खेळाडू, चौथे नाव आहे खास
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वात पहिला षटकार ठोकणारे भारताचे ३…
‘या’ ५ दिग्गजांची सचिनने सर्वाधिक वेळा घेतलीये फिरकी; पाहा…