कसोटी क्रिकेट एक असा प्रकार आहे, ज्याठिकाण खेळपट्टीवर खेळणाऱ्या फलंदाजाला कसलीही घाई नसते, फलंदाजांना स्थिरावण्यासाठी पूर्ण वेळ मिळतो. तसेच धावा करण्याचीही कसलीच घाई नसते आणि त्यांना फक्त खेळपट्टीवर आरामात टिकून खेळायचे असते. असे असले तरी, असे अनेक फलंदाज असतात, जे कसोटी क्रिकेटमध्ये देखील वेगाने धावा करतात आणि चौकार, षटकार मारतात.
जेव्हापासून टी२० क्रिकेटची सुरुवात झाली फलंदाजी दिवसेंदिवस आक्रमक होत चालली आहे. याचा परिणाम नक्कीच काही प्रमाणात कसोटी क्रिकेटवर देखील झाला आहे. टी२० क्रिकेटच्या आधीही असे अनेक फलंदाज होते, जे कसोटीमध्ये देखील फटकेबाजी करत असायचे. यामध्ये जागतिक क्रिकेटमधील ऍडम गिलक्रिस्ट, सनथ जयसूर्या आणि क्रिस गेल यांच्यासारख्या नावांचा समावेश येतो. आपण या लेखात तीन भारतीय खेळाडूंचा विचार करणार आहोत, ज्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार मारले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे तीन भारतीय खेळाडू
१. विरेंद्र सेहवाग- ९१ षटकार
भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. सेहवागला क्रिकेटच्या प्रकारामुळे जास्त काही फरक पडत नव्हता, तो तिन्ही प्रकारांमध्ये तुफान फटकेबाजी करायचा. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये वेळा त्रिशतकी खेळी केली आहे. विशेष म्हणजे यातील एकवेळा त्याने एक षटकार मारून त्रिशतकाला गवसणी घातली आहे. सेहवागने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १०४ सामने खेळले आणि ८५८६ धावा केल्या. या १०४ सामन्यांमध्ये त्याने ९१ षटकार मारले
२. एमएस धोनी – ७८ षटकार
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. धोनी एकदिवसीय क्रिकेटमधील एक महान खेळाडू आहे आणि त्याची कारकिर्दही मोठी आहे. पण कसोटी क्रिकेटमधील त्याची कारकीर्द एवढी मोठी नाही. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ९० सामने खेळले. त्याने त्याच्या या कसोटी कारकिर्दीत अगदी तशीच फलंदाजी केली, ज्यासाठी तो ओळखला जातो. त्याने कसोटी कारकिर्दीत ४८७६ धावा केल्या आहेत आणि यादरम्यान त्याने ७८ षटकार मारले आहेत. त्याला या ९० सामन्यांमध्ये १४४ वेळा फलंदाजी करण्याच योग आला.
३. सचिन तेंडुलकर – ६९ षटकार
भारतीय संघातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रिकेटमधील जवळपास सर्व मोठे विक्रम सचिनने नावावर केले आहेत. त्याने कसोटीमध्ये १५९२१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतक झळकावले आहेत. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २०० सामने खेळले आणि ३२९ वेळा फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने ६९ षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कृणाल पंड्याने सोडले बडोद्याचे कर्णधारपद, काही दिवसांपूर्वीच संघसहकारीने केले होते गंभीर आरोप
साऊदीने सांगितले आपल्या यशाचे गमक; म्हणाला…