ऑस्ट्रेलिया मधील ब्रिस्बेन हे क्रिकेट मैदान ‘गाबा’ या नावाने खूप प्रसिद्ध आहे. या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाचा खूप काळापासून पराभव झालेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ या मैदानावर अजेय आहे. या ठिकाणी खेळायला आलेल्या संघाना कसोटीत पराभूत व्हावे लागले आहे. त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर गावसकर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना या ठिकाणी खेळला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. भारतीय संघाला एकाही सामन्यात विजय मिळविता आलेला नाही. या मैदानावर झालेल्या 6 सामन्यापैकी भारतीय संघाला 5 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
भारतीय संघाला शेवटचा कसोटी सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करायची असेल तर, त्यांना गोलंदाजीमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. कारण या मैदानावर ज्या संघाची गोलंदाजी मजबूत आहे. त्या संघाच्या विजयाची शक्यता जास्त आहे. जो संघ विरुद्ध संघातील फलंदाज जितकी पटकन बाद करतील तेवढे विजय प्राप्त करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आज आपण लेखामधून या मैदानावर सर्वात जास्त विकेट्स घेणार्या तीन भारतीय खेळाडू बद्दल जाणून घेणार आहोत.
ब्रिस्बेन येथे सर्वाधिक जास्त विकेट घेणारे तीन भारतीय गोलंदाज-
3. इशांत शर्मा (6)
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे या बॉर्डर गावसकर मालिकेत सहभागी होवू शकला नाही. मात्र सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी झाला आहे. या भारतीय गोलंदाजाने ब्रिस्बेन येथील मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. इशांत शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध या ठिकाणी एक कसोटी सामना खेळला आहे. ज्यामध्ये इशांत शर्माने दोन्ही डावात एकूण 6 विकेट्स प्राप्त केल्या आहेत.
2. मदन लाल (6)
भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि 1983 साली विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य राहिले आहेत. मदन लाल हे त्यांच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखले जातात. ते उजव्या हाताचे फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. या दिग्गज अष्टपैलू खेळाडूने ब्रिस्बेन येते एकच कसोटी सामना खेळला आहे. हा सामना त्यांनी 1977 साली खेळला होता. ज्यामध्ये दमदार गोलंदाजी करताना या एका सामन्यात त्यांनी 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यापैकी एका डावात त्यांनी 5 गडी बाद केले होते.
1. इरापल्ली प्रसन्ना (8)
भारतीय संघाचे माजी खेळाडू इरापल्ली प्रसन्ना हे एक दिग्गज खेळाडू आहे. इरापल्ली प्रसन्ना हे भारतीय संघाचे फिरकीपटू होते. ते भारतीय मैदानाबरोबर विदेशातील मैदानावर ही यशस्वी ठरले आहेत. भारतीय संघासाठी सर्वात जलद कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. जो आरआश्विनने नंतर मोडला.
इरापल्ली प्रसन्ना हे फलंदाजांना मोठा फटका खेळण्यासाठी जाळे टाकायचे आणि या जाळ्यात फलंदाजांना अडकवत होते. या दिग्गज खेळाडूने भारतासाठी सर्वाधिक जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी ब्रिस्बेन येथे येथे दोन कसोटी सामने खेळताना 8 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
खेळाडूंच्या दुखापतींना आयपीएल जबाबदार, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचे परखड मत
विराट कोहलीला मुलगी झाल्याचे कळताच रितेश देशमुख यांनी दिली अशी प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ