क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. कोणताही क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी सर्व संघाला उत्तम कामगिरी करणे गरजेचे असते. फलंदाजी व क्षेत्ररक्षणाबरोबरच गोलंदाजीतही उत्तम कामगिरी करणारा संघ सामन्यात विजेता ठरतो. मागील काही वर्षांत भारताच्या वनडे सामन्यातील उत्तम कामगिरीचे श्रेय अनेक क्रिकेट पंडित भारतीय गोलंदाजांना देतात. २०२० वर्षात भारतीय गोलंदाज वनडे क्रिकेटमध्ये तितकेसे यशस्वी ठरले नाहीत व कदाचित त्याचमुळे भारतीय संघाला ९ सामन्यांमधील केवळ ३ सामन्यात विजय मिळवता आला. मात्र, या कठीण सामन्यांत देखील काही भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. आपण या लेखात बघणार आहोत वनडे क्रिकेटमध्ये २०२० वर्षात, एका सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे टॉप ३ भारतीय गोलंदाज.
३. शार्दुल ठाकूर (५१ धावा ३ विकेट्स) विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वर्षांच्या शेवटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शार्दुल ठाकूरला संघात खेळण्याची संधी मिळाली. आपल्या निवडीला योग्य ठरवत शार्दुलने या सामन्यात उत्तम कामगिरी केली. स्टीव्ह स्मिथसारख्या दिग्गज फलंदाजाला बाद करत शार्दुलने १० षटकात ५१ धावा देत ३ बळी मिळवले. त्याच्या या उत्तम गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघ ३०३ धावांचे आव्हान पार करू शकला नाही व भारताने मालिकेतील आपला पहिला विजय मिळवला.
२. युझवेंद्र चहल (४७ धावा ३ विकेट्स) विरुद्ध न्यूझीलंड
भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहलने मागील काही वर्षात भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी केलेली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातील एका सामन्यात चहलने मात्र ४७ धावा देत ३ बळी मिळवले. विशेष म्हणजे न्यूझीलंड संघाने या सामन्यात ३०० धावा केल्या होत्या. मात्र, चहलविरुद्ध त्यांनी बचावात्मक पवित्रा अविलंबला होता. या सामन्यात भारताला ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता.
१. मोहम्मद शमी (६३ धावा ४ विकेट्स) विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. वर्षाच्या सुरुवातीला भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शमी ने १० षटकात ६३ धावा देत तब्बल ४ फलंदाजांना बाद केले. शमीच्या या फेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने सामना जिंकत मालिका देखील आपल्या नावे केली.
ट्रेंडिंग लेख-
टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
महत्त्वाच्या बातम्या-
हे नाही पाहिलं तर काय पाहिलं! भक्कम बचाव असलेला पुजारा अफलातून चेंडूवर त्रिफळाचीत
धोनीच्या पत्नीने अस्वलाला चारले अन्न, तर सिंहाच्या छाव्याला पाजले दूध; Video तुफान व्हायरल