Indian Players in Australia Squad: ऑस्ट्रेलिया महिला अंडर 19 संघ लवकरच श्रीलंका आणि न्यूझीलंडसोबत तिरंगी मालिका खेळणार आहे. ही टी20 तिरंगी मालिका 19 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत होईल. याशिवाय वनडे तिरंगी मालिका देखील खेळवली जाईल. दरम्यान, भारतीय वंशाच्या तीन खेळाडू चर्चेत आल्या आहेत. ज्यांना या तिरंगी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. हसरत गिल, समारा दुल्विन आणि रिबिया सायन अशी या 3 खेळाडूंची नावे आहेत.
समारा दुल्विनबद्दल बोलायचे तर ती उजव्या हाताची फलंदाज आहे. तिने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियन अंडर 19 संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दुसरीकडे, रिबिया सायन उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करते. तसेच, ती आक्रमक फटकेबाजी करण्यात देखील तरबेज असून, अष्टपैलू म्हणून पुढे येत आहे. हसरत गिलही वेगवान गोलंदाजी करते. जी श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळली आहे.
हसरत मूळ अमृतसर शहरातील आहे. मात्र, नंतर तिचे कुटुंब ऑस्ट्रेलियात शिफ्ट झाले. श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्धच्या तिरंगी मालिकेत ती सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होती. याशिवाय तीने फलंदाजी करताना 48 धावांचे योगदान दिलेले. गिल महिला बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळली आहे.
निवडकर्त्यांनी टी20 आणि वनडे तिरंगी मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. प्रत्येक संघ टी20 तिरंगी मालिकेत 4 सामने खेळेल. तर, प्रत्येक संघ वनडे मालिकेत दोन सामने खेळताना दिसेल. संघात तीन भारतीय वंशाच्या खेळाडूंच्या समावेशाबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, “तिघींचाही संघात समावेश केल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील वाढती विविधता आणि भारतीय खेळाडूंचे महत्त्वही दिसून येते.” ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू क्रिस्टन बीम्स यांची या संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा –
पाकिस्तानी कर्णधारावर फिक्सिंगचा आरोप? मोहम्मद रिझवानबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित!
क्रिकेटविश्वात खळबळ! भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दिग्गज खेळाडूवर हत्येचा आरोप
‘या’ दिग्गज गोलंदाजांनी घेतली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक! एका भारतीयाचा समावेश