कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या बर्याच खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी करून अनेक विक्रमांच्या यादीमध्ये आपली नावे नोंदविली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत अनिल कुंबळे (Anil Kumble) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत असे १० भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावांव्यतिरिक्त १०० बळी देखील घेतले आहेत. या यादीत वीनू मंकड (Vinoo Mankad), कपिल देव, रवी शास्त्री, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजन सिंग, झहीर खान, इरफान पठाण, आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे.
पण जर एकाच कसोटी सामन्यातील शतकाबद्दल आणि एका डावात 5 विकेट्सच्या विक्रमाबद्दल बोललो तर फक्त ३ भारतीय खेळाडू असे करू शकले आहेत. या 3 खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
एका कसोटी सामन्यात शतक आणि ५ बळी घेणारे ३ भारतीय खेळाडू
१. वीनू मंकड (Vinoo Mankad) – १९५२ वि. इंग्लंड
१९५२ मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेच्या दुसर्या कसोटीत वीनू मंकड यांनी एकाच कसोटीत शतक केले होते आणि ५ बळीही मिळवले होते. असे करणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले होते. भारताच्या पहिल्या डावात ७२ धावा काढल्यानंतर वीनू मंकड यांनी दुसऱ्या डावात १८४ धावांची शानदार खेळी केली होती.
याशिवाय इंग्लंडच्या पहिल्या डावात त्यांनी १९६ धावा देऊन ५ बळी घेतले. इंग्लंडने (५३७ आणि ७९/२) भारताला (२३५ आणि ३७८ धावा) त्या कसोटीत ८ गडी राखून पराभूत केले.
२. पॉली उम्रीगर (Polly Umrigar) – १९६२ वि. वेस्टइंडीज
१९६२ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेलेल्या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात पॉली उम्रीगर यांनी शतक ठोकले आणि डावात ५ बळी देखील घेतले होते.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात पॉली उम्रीगर यांनी १०७ धावा देऊन ५ बळी घेतले होते. तसेच त्यांनी भारताच्या पहिल्या डावात ५६ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात नाबाद १७२ धावा केल्या होत्या. त्यांनी अशी उत्कृष्ट कामगिरी करूनही वेस्ट इंडीजने (४४४/९ आणि १७६/३) भारताला (१९७ आणि ४२२ धावा) ७ गडी राखून पराभूत केले होते.
३. आर अश्विन (Ravichandran Ashwin) – २०११ आणि २०१६ वि. वेस्ट इंडीज
एकाच कसोटी सामन्यात शतक आणि ५ बळी घेण्याचा विक्रम अश्विन २ वेळा केला आहे. तो ही एकाच संघाविरुद्ध. पहिल्यांदा २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटीत आणि दुसऱ्यांदा २०१६ मध्ये अँटिग्वा येथे खेळलेला पहिल्या कसोटीत त्याने हा विक्रम केला होता.
२०११ मधील मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात अश्विनने १५६ धावांत ५ गडी बाद केले होते आणि त्यानंतर भारताच्या पहिल्या डावात १०३ धावा केल्या होत्या. अश्विनची शानदार कामगिरी झाली असूनही वेस्ट इंडीज (५९० आणि १३४) आणि भारत (४८२ आणि २४९/०९) दरम्यानचा हा रोमांचक सामना अनिर्णित राहिला होता. भारतीय संघ विजयापासून फक्त एक धाव दूर होता तर वेस्ट इंडीज संघ विजयापासून फक्त एक विकेट दूर होता.
२०१६ मध्ये नॉर्थ साउंड, अँटिग्वा येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या एकमेव डावात भारताने ५६६/८ धावा केल्या, त्यात अश्विनने ११३ धावांचे योगदान दिले होते. मोठ्या धावसंख्येला उत्तर देताना भारतीय संघाने यजमान वेस्ट इंडीजला २४३ आणि २३१ धावांवर सर्वबाद केले आणि भारताने एक डाव आणि ९२ धावांनी सामना जिंकला. अश्विनने वेस्ट इंडिजच्या दुसर्या डावात ७ विकेट्स घेतल्या होत्या. या अष्टपैलू कामगिरीमुळेच सामनावीर म्हणूनही अश्विनला निवडले होते.
वाचनीय लेख –
केवळ ६ तासांत दोन वेळा तंबूचा रस्ता धरणारे ३ संघ, भारताने देखील…
एका वनडे सामन्यात ४ क्रिकेटर जेव्हा करतात शतक, भारताच्या या खेळाडूंनी देखील..
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया