भारतात क्रिकेट खेळणाऱ्या मुलाचे स्वप्न असते की त्याने एक ना एक दिवस भारताचे प्रतिनिधित्व करावे. मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात क्रिकेटपटू म्हणून राष्ट्रीय संघात स्थान मिळवणं खूप कठीण आहे. त्याला खूप मेहनत आणि सरावाची गरज असते. भारतात प्रत्येक घरात एक क्रिकेटर लपलेला असतो, असे म्हटले जाते. पण भारतीय संघात त्याच खेळाडूंची निवड केली जाते जे त्या स्थानासाठी योग्य असतील. त्यामुळे खेळाडूंची एवढी प्रतिभा पाहिजे की ते एवढ्या मोठ्या स्तरावर खेळतील.
पण अनेकदा भारतीय क्रिकेटजगतात असे आरोप झाले आहेत की घराणेशाहीमुळे काही जणांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तरी या लेखात आपण अशा ३ क्रिकेटपटूंचा आढावा घेऊ, ज्यांना त्यांच्या वडीलांच्या मर्जीमुळे भारतीय संघात कौशल्य नसतानाही स्थान मिळाले, असे म्हटले जाते.
१. रोहन गावसकर
दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा सुपुत्र रोहन गावस्कर याची भारतीय संघात कोणत्या कौशल्यावर झाली होती याचे कारण अजूनही अनेकांना कळले नाही. अनेक क्रिकेट चाहत्यांनी असे म्हटले होते की त्याची निवड ही त्याचे वडील सुनील गावसकरमुळे झाली होती. रोहन गावसकर हा भारतीय वनडे सामन्यात खेळाला आहे.
रोहन गावस्करची क्रिकेट कारकिर्द बघायला गेलो तर त्यानी आतापर्यंत १२६ अ दर्जाचे सामने खेळले आहेत व त्या सामन्यांमध्ये त्यांनी ३०.९६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचे भारतीय संघात खेळणे हे आश्चर्यचकित करणारे आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी ३०.९६ ची सरासरी ही खूप कमी आहे त्यामुळेच त्याला त्याच्या वडिलांमुळे भारतीय संघात स्थान मिळाले, असे म्हटले जाते.
रोहनने भारतीय संघासाठी खेळताना ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८.८८ च्या अत्यंत खराब सरासरीने केवळ १५१ धावा केल्या.
२. स्टुअर्ट बिन्नी
भारतीय संघाच्या निवडकर्त्यांकडून स्टुअर्ट बिन्नीला अनेक संधी देण्यात आल्या आहेत. तथापि, बिन्नी जेव्हा भारतीय संघात खेळत होता, तेव्हा त्याचे वडील रॉजर बिन्नी हे भारतीय संघाच्या निवड समितीमध्ये होते. स्टुअर्ट बिन्नीची भारतीय संघात स्थान मिळवण्याआधी फारशी चांगली कामगिरी नव्हती. तसेच भारताकडून खेळतानाही त्याला फारसे यश मिळाले नाही. असे असतानाही त्याने भारताकडून तिन्ही क्रिकेट प्रकारातून पदार्पण केले आहे. त्यामुळे त्याच्याबाबतीतही असे म्हटले जाते, की त्याला त्याच्या वडीलांमुळे भारतीय संघात स्थान मिळाले.
स्टुअर्ट बिन्नीने भारतीय संघासाठी ६ कसोटी सामने, १४ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने खेळले आहेत. बिन्नीने कसोटीत २१.५४ च्या सरासरीने १९४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने २८.७५ च्या सरासरीने २३० धावा केल्या आहेत. टी२० क्रिकेट कारकीर्दीत त्याने १७.५ च्या सरासरीने ३५ धावा केल्या आहेत. तसेच कसोटीत ३, एकदिवसीयमध्ये २० आणि टी२०मध्ये १ विकेट घेतली आहे.
३. अशोक मंकड
क्रिकेट विश्वात विनु मंकड हे महान अष्टपैलू म्हणून ओळखले जातात. भारताला क्रिकेटमध्ये पुढे नेण्यात त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांनी भारताकडून ४४ कसोटी सामन्यात ३१.४८ च्या सरासरीने २१०९ धावा केल्या आहेत व गोलंदाजी करताना त्यांनी १६९ विकेटही घेतल्या आहे.
विनु मांकड नंतर त्यांचे सुपुत्र अशोक मंकड यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. अशोक मंकडने भारतासाठी २२ कसोटी सामने खेळले व त्यात २५.४१ च्या सरासरीने ९१४ धावा आहेत. अशोक मंकड यांना आपल्या वडिलांसारखा महान क्रिकेटपटू बनता नाही आले. यांना भारतीय संघात यांच्या वडिलांमुळे खेळवले गेले आहे, असे म्हटले जाते
महत्वाच्या बातम्या
असं कोण रेनकोट घालतं! लॉर्ड्स कसोटीत दर्शकाची भलतीच कृती, दर्शकांसह समालोचकही लोटपोट
माजी ऑसी दिग्गजाने निवडले जगातील ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बुमराहला नाही दिली जागा
‘तो भारताचा थ्रीडी खेळाडू, त्याला संघाबाहेर करणं कठीण’; पाकिस्तानी खेळाडूकडून स्तुती