आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी२० लीग आहे. यामध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू एकत्र खेळतात. म्हणूनच ही स्पर्धा अतिशय रंजक आणि चुरशीची होते. या स्पर्धेत एमएल धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोस बटलरसह जगातील अनेक नामांकित खेळाडू खेळतात.
जर आपण आयपीएलबद्दल बोललो तर त्यात कर्णधारपदाची भूमिका फार मोठी असते. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ सर्वात यशस्वी संघ आहेत. कारण एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांसारख्या कर्णधारांमुळे.
त्यामुळे आयपीएलमध्ये कर्णधारपदाला खूप महत्त्व आहे. एकीकडे विराट कोहलीसारख्या दिग्गज कर्णधाराने एकदा ही आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही, तर दुसरीकडे रोहित शर्माच्या नावावर ४ आयपीएल ट्रॉफी आहेत.
आयपीएलमध्ये बर्याचदा असे घडले आहे, जेव्हा एखाद्या संघाची कामगिरी चांगली नसते, तेव्हा त्या संघाचा कर्णधार किंवा प्रशिक्षक याला काढून टाकले जाते. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटलसारख्या संघांनी आतापर्यंत अनेक कर्णधार बदलले आहेत.
या लेखात अशा ३ भारतीय खेळाडूंबद्दल आढावा घेण्यात आला आहे जे आयपीएलमध्ये त्यांच्या संघाचे कर्णधार बनू शकतात.
१. शुभमन गिल (Shubman Gill) – कोलकाता नाईट रायडर्स
शुभमन गिल भारताचा सर्वोत्कृष्ट युवा फलंदाज आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक २०१८ मधील कामगिरीने त्याने सर्वांना प्रभावित केले आणि म्हणूनच त्याला भारतीय संघात स्थान मिळाले.
याशिवाय आयपीएलमध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सच्या(केकेआर) टीमने विकत घेतले. केकेआरकडून खेळताना आतापर्यंत शुभमन गिलने अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत. तो आता संघात नियमित असतो. केकेआरचा कर्णधार सध्या दिनेश कार्तिक आहे पण येत्या हंगामात संघाने त्याच्या नेतृत्वात चांगली कामगिरी न केल्यास त्याला कर्णधारपदावरून काढून टाकले जाऊ शकते.
अशा परिस्थितीत केकेआरसाठी शुभमन गिल ही एक उत्तम निवड असू शकते. कारण तो एक तरुण खेळाडू आहे आणि बर्याच काळासाठी संघाचे नेतृत्व करू शकतो. त्याला देशांतर्गत सामने खेळण्याचा अनुभवही आहे.
२. रिषभ पंत (Rishabh Pant) – दिल्ली कॅपिटल
रिषभ पंत हा दिल्ली कॅपिटल संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटलचा कर्णधार सध्या श्रेयस अय्यर असून त्याच्या नेतृत्वात दिल्लीने शेवटच्या वेळी प्लेऑफपर्यंत मजल मारली होती.
श्रेयस अय्यर दिल्लीसाठी उत्तम कर्णधारपद सांभाळत आहे, पण येत्या काही वर्षांत दिल्लीचा संघ चांगला कामगिरी बजावत नसेल आणि कर्णधार पदावरून श्रेयसला काढलं तर पंत कर्णधारपदाचा दावेदार म्हणून पुढे येऊ शकतो.
३. सुरेश रैना (Suresh Raina) – चेन्नई सुपर किंग्ज
सुरेश रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा उपकर्णधार आहे. जेव्हा एमएस धोनी खेळत नाही तेव्हा सुरेश रैनाच संघाचे नेतृत्व करतो. एमएस धोनी ३९ वर्षांचा आहे, म्हणून आता तो २ किंवा ३ हंगामांहून अधिक मोसम खेळून निवृत्त होऊ शकतो.
धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदासाठी सुरेश रैना ही सर्वोत्तम निवड असू शकते. तो गेले बरेच हंगाम संघाचा उपकर्णधार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर काही सामन्यात तो भारतीय संघाचा कर्णधार देखील होता. धोनीबरोबर खेळण्याचा त्याला खूप अनुभवही मिळाला आहे. अशा परिस्थितीत सुरेश रैनाला चेन्नईचे कर्णधारपद देता येईल.
वाचनीय लेख –
क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर टाकणे सोप्पं नाही, हे ५ महारथी त्यात आहेत माहिर
आयपीएलमधील धोनीचे कारनामे रोहित काय जगातील कुणालाच मोडणे केवळ अशक्य