fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भले भले क्रिकेटर, जे युवराजच्या नेतृत्त्वाखाली खेळले आयपीएल सामने

September 16, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ SunRisers & KKRiders & RajasthanRoyals

Photo Courtesy: Twitter/ SunRisers & KKRiders & RajasthanRoyals


युवराज सिंग आयपीएलच्या पहिल्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात त्याचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. परंतु, आयपीएलच्या पहिल्या सत्रानंतर त्याला कर्णधारपदाची चुणूक फारशी दाखवता आली नाही. त्याने केवळ दोन मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले.

त्याने त्याच्या १२ वर्षांच्या आयपीएल कारकीर्दीत दोन संघाचे कर्णधार पद सांभाळले. पहिल्या दोन सत्रात तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता, त्यानंतर २०११ मध्ये तो पुणे वॉरियर्स इंडियाचा कर्णधार होता. पहिल्या सत्रानंतर तो आपल्या संघाला कधीही प्लेऑफपर्यंत पोहचवू शकला नाही.

युवराज सिंगने आयपीएलमध्ये ४३ सामन्यांचे कर्णधारपद सांभाळले, त्यातील २१ सामन्यात विजय मिळवला आणि २१ सामन्यात पराभव पत्करावा लागला तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

खरं तर सर्वाना माहिती आहे कि, युवराज सिंग कधीही भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकला नाही, परंतु लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आयपीएलमध्ये असे बरेच कर्णधार आहेत जे युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत.

युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली खेळलेले ४ दिग्गज कर्णधार –

१. ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) – पुणे वॉरियर्स इंडिया

ग्रॅमी स्मिथ हा दक्षिण आफ्रिका संघातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. स्मिथच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने मोठे यश मिळालं आहे. स्मिथ हा आयपीएल स्पर्धेत सहभागी झाला असला तरी त्याला कोणत्याही संघाचा कर्णधारपद मिळालं नाही.

स्मिथने आयपीएल कारकीर्दीत २९ सामने खेळले आणि ११०.६२ च्या स्ट्राइक रेटने ७३९ धावा केल्या. दरम्यान, त्याची सर्वोच्च धावसंख्या ९१ धावा होती.

स्मिथ आयपीएल २०११ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया संघाचा सदस्य होता आणि त्याने युवराज सिंगच्या नेतृत्वात ४ सामने खेळले होते. या ४ सामन्यांमध्ये स्मिथने ८२.३५ च्या स्ट्राइक रेटने अवघ्या ४२ धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या २४ होती. २०११ हे ग्रीम स्मिथचे आयपीएलमधील शेवटचे वर्षदेखील होते.

२. महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) – किंग्ज इलेव्हन पंजाब

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज महेला जयवर्धनेने आपल्या राष्ट्रीय संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. त्याने त्यांच्या नेतृत्वात श्रीलंकेला २००७ विश्वचषकामध्ये अंतिम फेरीपर्यंत नेले. तसे पाहता त्याची आकडेवारी खूप प्रभावी आहे.

याबरोबर जयवर्धने आयपीएलमध्येही खेळले आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन सत्रात महेला जयवर्धने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळला. युवराज सिंगच्या नेतृत्वात जयवर्धने २३ सामने खेळले आहेत आणि ३९८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले.

३. कुमार संगकारा (Kumar Sangakkara) -किंग्ज इलेव्हन पंजाब

कुमार संगकारा हा एक उत्तम फलंदाज आणि एक उत्तम कर्णधारही होता. त्याने २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचे नेतृत्व केले होते. याशिवाय आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधारही राहिला.

आयपीएलच्या पहिल्या तीन सत्रात संगकारा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला आणि तिसर्‍या सत्रात तो स्वतः संघाचा कर्णधारही होता. पण पहिल्या दोन सत्रात कुमार संगकारा युवराज सिंगच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये खेळला. युवराज सिंगच्या नेतृत्वात खेळत कुमार संगकाराने २४ सामन्यांत ६५२ धावा केल्या आणि ६ अर्धशतकेही ठोकली.

४. सौरव गांगुली (Sourav Ganguly) -पुणे वॉरियर्स इंडिया

युवराज सिंगने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच दादा त्याचा आवडता कर्णधार आहे सांगत आणि दादाच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल घडवून आणले, ज्यामुळे संघालाही बर्‍यापैकी यश मिळाले.

आयपीएल २०११ मध्ये सौरव गांगुली पुणे वॉरियर्स इंडियाशी जोडला गेला. दरम्यान त्याने युवराज सिंगच्या नेतृत्वात चार सामने खेळले. या ४ सामन्यात दादाने २५.०० च्या सरासरीने आणि. ८४.७४ च्या स्ट्राइक रेटने ५० धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३२ होती.

वाचनीय लेख –

टॉप ७: कसोटी कर्णधारांची गमतीशीर आकडेवारी

हेन्री ओलोंगा: थेट आपल्याच देशाच्या राष्ट्रपतीला भिडलेला क्रिकेटर

असे ३ दिग्गज खेळाडू ज्यांनी रचले मोठे विक्रम, पण कर्णधार म्हणून ठरले फ्लॉप


Previous Post

असे तीन भारतीय प्रतिभावान क्रिकेटर, जे होऊ शकतात आपल्याच आयपीएल संघाचे कर्णधार

Next Post

जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट

Related Posts

Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

January 26, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/mipaltan

जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट

Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals

यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांत परदेशी खेळाडूच ठरले होते किंग, फक्त एक भारतीय...

Photo Courtesy: Screengrab/hotstar.com

मलिंगाच्या जागी सहभागी झालेला बुमराहचा संघसहकारी म्हणतोय, बुमराह म्हणजे...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.