श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या टीम इंडियानं 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला केला होता. परंतु एकदिवसीय मालिकेत स्टार खेळाडू असूनही भारत 0-1 ने पिछाडीवर आहे.
रविवारी (4 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा श्रीलंकेकडून 32 धावांनी पराभव झाला. तर पहिला सामना बरोबरीत सुटला होता. अशा स्थितीत टीम इंडियाला तिसऱ्या वनडेत कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल, अन्यथा भारत मालिका गमावून बसेल.
भारताला 7 ऑगस्ट गोजी कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाला निश्चितपणे प्लेइंग 11 बाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. भारताला या सामन्यातून अशा खेळाडूंना वगळावं लागेल, ज्यांची पहिल्या दोन वनडेमध्ये कामगिरी विशेष नव्हती. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 3 खेळाडूंबंद्दल सांगणार आहोत, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्याच्या तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे.
(3) शिवम दुबे – हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत एकदिवसीय मालिकेत संधी मिळालेल्या शिवम दुबेची कामगिरी अतिशय सामान्य राहिली. त्याच्याकडून अपेक्षा होती की, फलंदाजी करताना तो आपल्या क्षमतेनुसार फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके मारेल, पण तसं झालं नाही. दुबे पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विजयाच्या जवळ घेऊन गेल्यानंतर बाद झाला. तर दुसऱ्या वनडेत त्यानं 4 चेंडू खेळले, पण तो आपलं खातं उघडण्यात अपयशी ठरला. अशा स्थितीत टीम इंडियानं त्याला तिसऱ्या वनडेतून बाहेरचा रस्ता दाखवायला पाहिजे.
(2) अर्शदीप सिंग – वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं अलिकडच्या काळात टी20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये तो आपली लय कायम राखू शकला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंगनं शेवटच्या षटकांमध्ये अनेक धावा दिल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीपला एकही विकेट मिळाली नाही. शिवाय त्यानं 9 षटकात 58 धावा दिल्या. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्लेइंग 11 मध्ये बाहेर बसलेल्या एखाद्या वेगवान गोलंदाजांला संधी द्यायला हवी.
(1) केएल राहुल – 2023 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संथ खेळीमुळे टीकेला सामोरे गेलेला केएल राहुल पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. राहुलनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात 31 धावांची इनिंग खेळली, पण तो भारताला सामना जिंकवून देऊ शकला नाही. त्याचवेळी दुसऱ्या वनडेत तो शून्यावर बाद झाला. राहुलचा आत्मविश्वास कमी झालेला दिसत आहे. त्याला श्रीलंकेच्या कठीण खेळपट्ट्यांवर खेळासाठी वेळ मिळत नसल्याचं दिसत आहे. अशा स्थितीत टीम इंडियानं तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यासाठी रिषभ पंतला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळवण्याचा विचार करायला हवा.
हेही वाचा –
भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर होईल का?
IND vs SL निर्णायक सामन्यात भारताचा पराभव, श्रीलंकेचा 32 धावांनी शानदार विजय
यामुळे झाला पराभव, भारताच्या श्रीलंकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवामागची 3 प्रमुख कारणं