इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार येत्या १९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या थरार पाहायला मिळणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान बीसीसीआयने देखील टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत, जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
काही महत्वाच्या खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले आहे. तर एमएस धोनीची मेंटर म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान या संघात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची निवड झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य झाले असेल. चला तर पाहूया कोण आहेत ते खेळाडू.
१) अक्षर पटेल :
डाव्या हाताचा फिरकीपटू अक्षर पटेलची टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याची निवड झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. या संघात डाव्या हाताचा फिरकीपटू रवींद्र जडेजाला देखील संधी देण्यात आली आहे. तसेच या संघात आणखी ४ फिरकीपटू असताना अक्षर पटेलला संधी का दिली असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
अक्षर पटेल ऐवजी भारतीय संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला किंवा अतिरिक्त फलंदाजाला संधी देता आली असती. तसं पाहायला गेलं तर, अक्षर पटेलला भारतीय संघासाठी जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाहीये. त्यामुळे त्याची संघात निवड होणे आश्चर्यकारक आहे.
२)वरूण चक्रवर्ती :
वरूण चक्रवर्तीची देखील आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना वरूण चक्रवर्तीला खेळण्याची संधी मिळाली होती. तो एक मिस्ट्री गोलंदाज आहे. परंतु त्याला जास्त अनुभव नाहीये.
दरम्यान, भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलला संधी मिळाली नाही. त्यामुळे वरूण चक्रवर्तीची निवड नक्कीच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का असेल. कारण युजवेंद्र चहल हा भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज आहे. तसेच भारतीय चहलने भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद केले आहेत. श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत देखील चहलने वरूण चक्रवर्तीपेक्षा चांगली कामगिरी केली होती.(3 indian players who should not have been selected for T20 world cup)
३) मोहम्मद शमी:
मोहम्मद शमीची देखील आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या संघात शमीचे नाव पाहून देखील अनेकांना आश्चर्य झाले असेल. कारण शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर देखील या संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार होते. या दोन्ही गोलंदाजांनी गेल्या काही महिन्यांपासून अप्रतिम कामगिरी केली आहे.
दुसरीकडे मोहम्मद शमीला अनुभव आहे असेच तो एक घातक गोलंदाज देखील आहे. परंतु, त्याची टी -२० कारकीर्द इतकी खास नाही. त्याने १२ टी -२० सामन्यात ९.८ च्या इकोनॉमिने १२ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बांगलादेशच्या गोलंदाजाने आपल्याच गोलंदाजीवर हवेत सूर मारत पकडला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
बायको असावी अशी! चहलचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पत्नी धनश्रीने केली खास पोस्ट शेअर
धोनी मेंटर बनण्यामुळे टीम इंडियाला होऊ शकतात ‘हे’ ५ फायदे