अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही उद्योन्मुख खेळाडूंसाठीचे व्यासपीठ समजले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघाला मिळाले आहेत. यामध्ये मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉ व यश धुल यांच्या नेतृत्वाखाली भारताने या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. तर हा अंतिम सामना रविवारी, ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहे. अशा स्थितीत अंतिम सामनाही अतिशय रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे.
याबरोबरच, आयसीसीने या अंतिम सामन्यांआधी ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ साठी 8 खेळांडूची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय संघातील तीन खेळांडूचा समावेश आहे. यात भारतीय कर्णधार उद्य सहारन, स्पिनर सौम्य पांडे आणि ऑलराउंडर मुशीर खानचा अशा तीन खेळाडूंची भारतीय संघातून निवड करण्यात आली आहे.
तसेच, आयसीसीचा एक अधिकारी म्हंटला आहे की, ” ICC U19 विश्वचषक क्रिकेटमध्ये यावर्षी अनेक खेळांडूनी चांगले प्रदर्शन केले आहे. तसेच ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ बनण्यासाठी फक्त 8 खेळाडूंची नावे जाहिर करण्यात आली आहेत” यामध्ये तीन भारतीयांचे प्रदर्शन पाहिले तर कर्णधार उद्य सहारनने या अंडर 19 विश्वचषक क्रिकेटच्या 6 सामन्यांत 64.83 च्या औसतने 389 धावा केल्या आहेत. तर ऑलराउंडर मुशीर खानने 6 सामन्यांत 67.60 च्या औसतने 338 धावा केल्या आहेत. याबरोबरच, स्पिनर सौम्य पांडे याने 6 सामन्यांत 8.47 च्या औसतने आत्तापर्यंत 17 विकेट घेतल्या आहेत.
अशातच ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ साठी बाकी देशाच्या खेळाडूंचा विचार केला तर साऊथ अफ्रिका कडून मफाका आणि स्टीव स्टोल्क यांना जागा मिळाली आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ह्यूज वेईबगन, तर पाकिस्तान कडून उबैद शाह आणि वेस्टइंडिज कडून ज्वेल एंड्रयूचा यादीत समावेश करण्यात आला आहे.
घ्या जाणून ICC U19 विश्वचषक ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ खेळाडूंची यादी :-
क्वेना मफाका (साऊथ अफ्रिका), उबैद शाह (पाकिस्तान), सौम्य पांडे (भारत), मुशीर खान (भारत), ज्वेल एंड्रयू (ऑस्ट्रेलिया), उद्य सहारन (भारत), आणि स्टीव स्टोल्क ( साऊथ अफ्रिका).
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । ‘काहीच अडचण नाही, मी पण…’, विराटला सपोर्ट करताना डेल स्टेनने सांगितला स्वतःचा किस्सा