बीसीसीआयने आज उद्या करत करत तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पण, तुम्हाला माहित आहे का? आजच्या दिवशी भारतीय संघाने कसोटी सामन्यात इतिहास रचला होता. चला मग जाणून घेऊयात 72 वर्षापूर्वी भारतीय संघाने कोणता कारनामा केला होता.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील आजचा दिवस खूप खास आहे. कारण,1952 मध्ये 10 फेब्रुवारीला भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये पहिला विजय मिळाला होता. तर भारताचा पहिला कसोटी विजय हा चेन्नई सुपर किंग्जच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये मिळाला होता. तेव्हा प्रतिस्पर्धी संघ होता इंग्लंड, तर विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली भारताने बरोबर ७२ वर्षांपूर्वी एक डाव आणि ८ धावांनी पराभव करून कसोटी क्रिकेटमध्ये पहिला विजय मिळवला होता.
याबरोबरच, भारताने 1932 मध्ये पहिली कसोटी खेळली आणि 25 व्या कसोटीत पहिला विजय मिळवला होता. तर भारताच्या या विजयाचा हिरो होता डावखुरा फिरकीपटू विनू मांकड, ज्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात 55 धावांत 8 विकेट घेतल्या, त्यामुळे इंग्लंडचा संघ 266 धावांवर गडगडला होता. त्याला प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात पंकज रॉय आणि पॉली उमरीगर यांच्या शतकांमुळे 457/9 धावांवर डाव घोषित करण्यात आला होता.
तर, इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 183 धावांत आटोपला. या डावातही विनू मांकडने आपल्या फिरकीने चमत्कार घडवला असून त्याने 53 धावांत 4 बळी घेतले होते. तसेच, ऑफस्पिनर गुलाम अहमदलाही 4 बळी मिळाले होते. यामुळे भारतीय संघाने अशा प्रकारे मालिकेतील शेवटचा कसोटी सामना एक डाव आणि 8 धावांनी जिंकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली होती.
दरम्यान, त्या ऐतिहासिक विजयात यष्टिरक्षक प्रबीर कुमार सेन यांचा मोलाचा वाटा होता. तर या सामन्यात त्याने एकूण 5 स्टंपिंग केले होते. ज्यात पहिल्या डावात 4. त्यानंतर खोखननंतर, किरण मोरेने मद्रासमध्येच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत एकूण 6 स्टंपिंग केले होते.
महत्वाच्या बातम्या –
Video : ‘जो जिता वही सिकंदर’, अर्रर्र.. अपेक्षा नव्हती ते सिकंदरने शेवटच्या चेंडूवर दाखवलं करुन