---Advertisement---

VIDEO: रणजी ट्रॉफी फायनलमध्ये ट्विस्ट! केएल राहुलने केली बॉलिंग, 11 वर्षांनंतर फर्स्ट क्लासमध्ये सक्तीने…

On: शनिवार, फेब्रुवारी 28, 2026 1:47 PM
---Advertisement---

केएल राहुल एक विकेटकीपर-फलंदाज म्हणून सर्वांना माहितच आहे. सध्या तो भारतीय संघातून बाहेर असून स्थानिक क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. भारतीय क्रिकेटमधील मानाची स्थानिक असलेल्या स्पर्धा रणजी ट्रॉफीच्या २०२५-२६ हंगामाच्या अंतिम फेरीचा सामना (२४-२८ फेब्रुवारी) सुरू आहे. हा सामना कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राहुलचे एक नवे रुप पाहायला मिळाले आहे. त्याने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली नसेल, मात्र आज (२८ फेब्रुवारी) त्याने गोलंदाजीत हात आजमावला.

कर्नाटक विरुद्ध जम्मू-काश्मीर सामना हुबळीमध्ये सुरू आहे. आजचा या सामन्याचा शेवटचा दिवस असून राहुलने दोन षटके गोलंदाजी केली आहे. त्याने ऑक्टोबर २०१५ नंतर आता प्रथम श्रेणीमध्ये गोलंदाजी केली आहे. या सामन्यात जम्मू-काश्मीरचे फलंदाज चांगलेच फॉर्ममध्ये दिसत आहेत. यामुळे कर्नाटकचा कर्णधार देवदत्त पड्डीकलने राहुलला गोलंदाजी करण्यास सांगितले. त्याने पहिल्या षटकात ३ धावा दिल्या, त्यामुळे त्याने दुसरे षटकही टाकले आणि त्यात १० धावा दिल्या.

राहुलच्या नावावर लिस्ट ए क्रिकेटमध्ये एक विकेटही आहे. तसेच त्याने प्रथम श्रेणीच्या कारकिर्दीत गोलंदाजी केली आहे, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. रणजी ट्रॉफीमध्ये त्याला विकेट मिळाली असती, परंतु मयंक अग्रवालने तो झेल सोडला. तरीही राहुलच्या या गोलंदाजीची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

राहुलने एकपासून ते सात क्रमांकापर्यंत फलंदाजी केली आहे. तो विकेटकीपर तर आहेच, तसेच त्याने नेतृत्वही केले आहे आणि आता तो गोलंदाजीही करत आहे. त्याने प्रथम श्रेणीच्या ९ डावांमध्ये गोलंदाजी केली असून त्याला १० वर्ष झाली आहेत. आता त्याची ही ऑफ-स्पिन गोलंदाजी पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

या सामन्यात जम्मू-काश्मीरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यामध्ये पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभारला. त्याबदल्यात कर्नाटकचा पहिला डाव २९३ धावसंख्येवरच संपुष्टात आला. यावरून जम्मू-काश्मीरने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही कमाल करत आहेत. तसेच त्यांचा दुसरा डाव सुरू असून ६२३ धावांची आघाडी घेतली आहे. यामुळे आठ वेळेचा रणजी ट्रॉफी विजेता कर्नाटकचा पराभव निश्चित आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---