क्रिकेटमध्ये T20 क्रिकेट हे मनोरंजनाने भरलेले आहे. याबरोबरच एखाद्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर निकाल लागला की, त्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांची काय अवस्था असेल, हे तुम्ही देखील समजू शकता. सध्या क्रिकेटमध्ये हाच थरार शनिवारी रात्री ILT20 सामन्यात पाहायला मिळाला आहे. या सामन्यात दुबई कॅपिटल्स आणि डेझर्ट वायपर्स हे संघ आमनेसामने आले होते.
तसेच, क्रिकेटमध्ये सिकंदर रजाने आपल्या टीमला स्वबळावर विजयी देखील केले आहे. यामध्ये त्याने अनेकवेळा झिम्बाब्वेसाठी कमाल केली आहे. आयपीएलसह जगभरातील T20 लीगमध्ये त्याने अशीच कमाल दाखवली आहे. तसेच क्रिकेटमध्ये हाच थरार शनिवारी रात्री यूएईमधील IL T20 लीगमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळाला आहे.
शनिवारी रात्री यूएईमधील IL T20 लीगमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर डेझर्ट वायपर्सने दुबई कॅपिटल्ससमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यामध्ये दुबई कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली आणि 32 धावांवर 3 गडी गमावले होते. अशा परिस्थितीत सिकंदर रजा आणि कॅप्टन सॅम बिलिंग्सने इनिंग संभाळली. दोघांनी टीमला 100 च्या पार नलें. त्यानंतर बिलिंग्स आऊट झाला. मग सिकंदरने सर्व जबाबदारी संभाळली होती.
SIKANDAR RAZA, TAKE A BOW! 6 WAS NEEDED OFF THE LAST BALL AND HE HITS A 6 🇿🇼🔥🔥🔥
Sikandar keeps Dubai Capitals in the race. What a player @SRazaB24 is! He's phenomenal ♥️🫡 #ILT20 pic.twitter.com/6UTQnx80DI
— Shaheer Shah (@ShaheerSha26418) February 9, 2024
याबरोबरच,कॅपिटल्सला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज असताना सामन्यात उत्साह निर्माण झाला होता. तर कॅपिटल्ससाठी सिकंदर रझा सोबत स्कॉट कुग्गेलिझन खेळत होता. तसेच वेगवान गोलंदाज मायकेल नेसरने वायपर्ससाठी शेवटचे षटक टाकत होता. यामध्ये नेसरच्या पहिल्याच चेंडूवर कुग्गेलिजनने चौकार ठोकला. तर दुसरा चेंडू हा मायकेल नेसरने डॉट टाकला होता. तिसऱ्या चेंडूवर कुगेलिनने एकल चोरून रझाला स्ट्राइक दिली. रझाने चौथ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. तर आता दुबईला 2 चेंडूत 6 धावांची गरज होती. नेसरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. रझाने शेवटच्या चेंडूवर नेसरला षटकार खेचून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री यूएईमधील IL T20 लीगमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर डेझर्ट वायपर्सने दुबई कॅपिटल्स याच्यामध्ये झालेल्या सामन्यांत सिकंदरने लॉन्ग ऑफ बाऊंड्रीच्या बाहेर सिक्स मारुन 5 विकेटने टीमला जोरदार विजय मिळवून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –