आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारताने चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला आहे. स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने (Rashid Latif) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) एक आश्चर्यकारक सल्ला दिला आहे.
रशीद लतीफ (Rashid Latif) म्हणाला की, जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान (India And Pakistan) त्यांच्या परस्पर समस्या सोडवत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याकडून यजमानपद काढून घेतले पाहिजे. एका टीव्ही चॅनलशी बोलताना रशीद लतीफ म्हणाला, “मी सुचवतो की आयसीसीने 2024-2031 सायकलसाठी भारत आणि पाकिस्तानकडून सर्व जागतिक स्पर्धांचे आयोजन करण्याचे अधिकार काढून घ्यावेत. आयसीसीने या मंडळांना सांगावे की प्रथम सर्व समस्या सोडवा आणि नंतर आम्ही तुम्हाला आयोजनाचे अधिकार देऊ.”
मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यासाठी भारत सरकारने नकार दिला आहे. यानंतर ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. आशिया कपसाठी भारताने 2008 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणावामुळे भारताने एकदाही पाकिस्तान दौरा केला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; पंतने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
IND vs AUS; झेल सोडण्यात कोहली पटाईत, पाकिस्तानच्या बाबर आझमलाही टाकलं मागे
VIDEO; “लिलावात कुठे जाणार आहेस?” विचारलेल्या प्रश्नावर रिषभ पंतने दिले उत्तर






