गेल्या काही महिन्यांपासून चाहते मोठ्या आतुरतेने इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची वाट पाहत आहेत. आयपीएलच्या आयोजनाबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित झालेली आयपीएल १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरपर्यंत युएई येथे खेळवली जाणार आहे.
संघाविषयी बोलायचे झाले तर, गतवर्षीच म्हणजे २०१९लाच आयपीएल२०२०चा लिलाव पार पडला होता. त्यामुळे सर्व संघ पुर्वीपासूनच निश्चित आहेत. जवळपास सर्व संघ संतुलित दिसत आहेत. परंतु, काही कारणांमुळे काही संघ कमजोर असल्याचेही समोर येत आहे.
या लेखात त्या ३ संघांचा आढावा घेण्यात आला आहे. तर बघूयात, नक्की कोणते आहेत ते संघ आणि त्यांच्या कमजोरीमागील कारणे – (3 IPL Teams Which Are Very Weak This Season)
१. कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्स {केकेआर} या संघाने यावर्षी त्यांच्या संघातील जुना खेळाडू क्रिस लीनला बाहेर केले आहे. लीनने पाकिस्तान सुपर लीगमध्ये दमदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे इयॉन मॉर्गन आणि लोकी फर्ग्युसन यांच्याव्यतिरिक्त कोणताही धाकड परदेशी खेळाडू केेकेआर संघात दिसून येत नाही. हीच त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. असे असले तरी, संघात कर्णधार दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसल हे विश्वसनीय खेळाडू आहेत.
असा आहे संघ – दिनेश कार्तिक {कर्णधार}, आंद्रे रसल, हॅरी गर्नी, कमलेश नागरकोटी, लोकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदिप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नारायण, इयॉन मॉर्गन, पॅट कमिंन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, मनिमारन सिद्धार्थ, क्रिस ग्रीन, टॉम बेंटन, प्रविण तांबे आणि निखिल नाईक.
२. दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स या संघात कर्णधार श्रेयश अय्यर, कागिसो रबाडा आणि शिखर धवन हे प्रमुख खेळाडू ठरु शकतात. जेसन रॉय हा देखील एक उत्तम पर्याय आहे. परंतु, या संघाला चांगल्या मॅच फिनिशरची गरज आहे. तसेच, बरेच वरच्या फळीतील फलंदाज आहेत. अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, जेसन रॉय, शिखर धवन, इत्यादी उत्तम सलामीवीर फलंदाज आहेत. पण, मधल्या फळीसाठी श्रेयश अय्यर हा एकच विश्वसनीय फलंदाज आहे. त्यामुळे मधल्या फळीत दमदार फलंदाजांची कमी आहे.
असा आहे संघ – श्रेयश अय्यर {कर्णधार}, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, हर्शल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कीमो पॉल, पृथ्वी शॉ, रविश्चंद्रन अश्विन, ऋषभ पंत, संदिप लामिचाने, शिखर धवन, एलेक्स कॅरी, जेसन रॉय, शिमरोन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टोइनिस आणि ललित यादव.
३. चेन्नई सुपर किंग्स –
चेन्नई सुपर किंग्स {सीएसके} संघात शेन वॉटसन आणि रविंद्र जडेजा हे असे खेळाडू आहेत, जे कोविड-१९मुळे क्रिकेट ठप्प होण्यापुर्वी नियमित क्रिकेट खेळत होते. यांमध्ये ड्वेन ब्रावो आणि फाफ डू प्लेसीस यांचाही समावेश होता. पण, एसएस धोनी, सुरेश रैना, हरभजन सिंग हे खेळाडू नियमित क्रिकेट खेळत नाहीत. धोनीने २०१९मधील विश्वचषकानंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यामुळे असे म्हणू शकतो की, यंदा सीएसके हा संघ जास्त मजबूत नाही.
असा आहे संघ – एमएस धोनी कर्णधार, अंबाती रायडू, आसिफ के, दीपक चाहर. ड्वेन ब्रावो, फाफ डू प्लेसीस, हरभजन सिंग, इमरान ताहिर, जगदीसन नारायण, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एमडिगि, मिचेल सैंटनर, मोनू सिंह, मुरली विजय, रविंद जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, सुरेश रैना, सॅम करन, जोश हेजलवुड, पियुष चावला आणि साई किशोर.
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात…
फक्त भारतात नव्हे तर परदेशातही आहेत या ३ भारतीय दिग्गज…
कसोटी सामन्याच्या एका डावात ३५० पेक्षा जास्त धावा करणारे ५…