रविवारी (४ ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे रात्री ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी ४ सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एक सामना जिंकण्यात या दोन्ही संघांना यश आले आहे. त्यामुळे आज हंगामातील दूसरा विजय मिळवत संघाच्या खात्यात २ गुणांची भर पाडण्यासाठी हे दोन्ही संघ अथक परिश्रम करताना दिसतील.
जर केएल राहुलच्या नेतृत्त्वाखालील किंग्स इलेव्हन पंजाब संघाविषयी बोलायचं झालं, यापुर्वीच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला १९२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पंजाब संघ २० षटकात ८ विकेट्स गमावत १४८ धावाच करु शकला होता. दरम्यान कोणताही फलंदाज ५० धावादेखील करु शकला नव्हता. गोलंदाजीतही संघाला जास्त चांगली कामगिरी करता आली नव्हती.
अशात जर या संघाला चेन्नईविरुद्धचा सामना जिंकायचा असेल, तर त्यांना संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करावे लागतील. या लेखात, आम्ही त्याच बदलांचा आढावा घेतला आहे. चला तर बघूया..
१) करुण नायरच्या ठिकाणी द्यावी मनदीप सिंगला संधी
आयपीएल २०२०मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यात पंजाबचा फलंदाज करुण नायरला जास्त कमालीचे फलंदाजी प्रदर्शन करता आलेले नाही. आतापर्यंत या उजव्या हाताच्या फलंदाजाने ४ सामने खेळत ११४च्या स्ट्राईक रेटने एकूण १६ धावाच केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने १ धाव, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १५ आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध शून्य धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
त्यामुळे पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नायरचा फॉर्म पाहता आजच्या सामन्यात त्याच्याजागी मनदिप सिंगला संधी द्यावी. या धुरंधरने त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारिकिर्दीत मोठमोठ्या खेळी केल्या आहेत. त्याच्या आगमनाने पंजाबची मधली फळी मजबूत बनेल.
२) कृष्णप्पा गौतमच्या जागी इशान पोरेलला संधी
आज चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पंजाब संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अजून एक महत्त्वाचा बदल दिसू शकतो. कर्णधार राहुल फिरकीपटू कृष्णप्पा गौतमच्या ठिकाणी इशान पोरेलला संधी देऊ शकतो. कारण गौतमला आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये २ सामने खेळायला मिळाले आहेत. दरम्यान तो फक्त १ विकेट घेऊ शकला आहे. तसेच त्याने खालच्या फळीत फलंदाजी करताना फक्त ४२ धावा केल्या आहेत.
जर पोरेलला आज संधी मिळाली तर, तो संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान देऊ शकतो. या २२ वर्षीय वेगवान गोलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने २२ प्रथम श्रेणी सामन्यात ६१ विकेट्स, २५ अ दर्जाच्या सामन्यात ४१ विकेट्स आणि १४ देशांतर्गत टी२० सामन्यात १६ विकेट्स चटकावल्या आहेत. सोबतच तो गरजेनुसार फलंदाजीदेखील करु शकतो.
३) जेम्स नीशमच्या जागी मुजीब उर रेहमान
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाजी अष्टपैलू खेळाडू जेम्स नीशमच्या जागी अफघानिस्तानच्या युवा खेळाडू मुजीब उर रेहमान पंजाबकडून खेळताना दिसू शकतो. या फिरकी गोलंदाजाला आयपीएलमध्ये जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत उत्तमोत्तम प्रदर्शन करताना दिसला आहे. रेहमानने २०८-१९मध्ये १६ आयपीएल सामने खेळत १७ विकेट्सची कामगिरी केली आहे.
तर जेम्स नीशमने आयपीएलच्या तेराव्या हंगामात ३ सामने खेळले आहेत आणि केवळ २ विकेट घेतली आहे. त्यामुळे रेहमानच्या उपस्थितीमुळे संघाला थोडा तरी फायदा होऊ शकतो.
ट्रेंडिंग लेख-
बेंगलोरने राजस्थानविरुद्धचा सामना एकहाती जिंकला; पाहा राजस्थानच्या पराभवाची ३ प्रमुख कारणे
वाढदिवस विशेष: यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
अनुभवी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या चेन्नईला लोळवणारा १९ वर्षांचा पोरगा, वाचा ‘त्याच्या’ संघर्षाची कहानी
महत्त्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिकने मॉर्गन, रसेलच्या नंतर फलंदाजी करावी, पाहा कोणी दिला सल्ला
दुर्दैवी! आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायरचा आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू, क्रिडाविश्वात हळहळ
नको रे बाबा! ‘कोलकाता संघातील खेळाडूंसोबत फलंदाजी करणे…’ मॉर्गनने दिली प्रतिक्रिया