आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champion’s Trophy) पाकिस्तामध्ये खेळली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्राॅफीचे आयोजन फेब्रुवारी-मार्च मध्ये होण्याची शक्यता आहे. आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या जेतेपदासाठी 8 संघ लढताना दिसणार आहेत. तत्पूर्वी या स्पर्धेत अनेक प्रमुख संघ खेळताना दिसणार नाहीत. कारण ते चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी क्वालिफाय करण्यात अयशस्वी ठरले आहेत. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्राॅफीचे यजमानपद असल्यामुळे ते क्वालिफाय झाले आहेत, तर भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांनी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी क्वालिफाय केले आहे.
1) वेस्ट इंडिज- वेस्ट इंडिजचा संघ 2023च्या विश्वचषकात देखील क्वालिफाय करण्यात अयशस्वी ठरला होता. त्यामुळे आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये देखील वेस्ट इंडिजचा संघ खेळताना दिसणार नाही. वेस्ट इंडिजने 2004 मध्ये चॅम्पियन्स ट्राॅफीवर नाव कोरले होते.
2) श्रीलंका- श्रीलंका आतापर्यंत खेळलेल्या सर्व आवृत्त्यांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले आहे. 2002 मध्ये टीम इंडियासोबत श्रीलंकेचा संघही संयुक्त चॅम्पियन बनला होता. पण 2023च्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका नवव्या स्थानावर राहिला. त्यामुळे हा संघ पात्र ठरू शकला नाही.
3) नीदरलँड- नीदरलँडचा संघ आयसीसीच्या जवळपास प्रत्येक मर्यादित षटकांच्या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यशस्वी ठरला आहे. नेदरलँड्स 2012 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शेवटचा दिसला होता. यावेळीही नीदरलँड्सला चॅम्पियन्स ट्राॅफीत जलवा दाखवता येणार नाही.
4) आयर्लंड- आयर्लंड संघ आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकदाही दिसला नाही आणि यावेळीही तो पात्र ठरू शकला नाही.
5) झिम्बाब्वे- झिम्बाब्वे क्रिकेट संघ यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार नाही. हा संघ स्पर्धेच्या इतिहासात पाच वेळा दिसला आहे. झिम्बाब्वे 2006 पासून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
दुलीप ट्रॉफीतून खेळाडू किती पैसे कमावतात? विजेत्या आणि उपविजेत्यांच्या बक्षिस रकमेतही वाढ
‘या’ दिग्गजाला ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघात स्थान मिळालंच पाहिजे, माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा
लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजाची भारतीय संघात निवड, कसोटी मालिकेसाठी खास जबाबदारी