बऱ्याचदा असे पाहायला मिळते की, चालू क्रिकेट सामना मध्येच थोड्या वेळासाठी थांबवला जातो किंवा कधी-कधी रद्द केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे, पाऊस. आतापर्यंत बऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यातील महत्त्वाच्या क्षणाला पावसाने घोळ घातला आहे. याव्यतिरिक्त जास्त सुर्यप्रकाश, ढगाळलेले हवामान किंवा फ्लड लाईट्स बंद पडणे यामुळे सामना थांबलेला आहे.
याव्यतिरिक्त सामना सुरु झाल्यानंतर खराब खेळपट्टीमुळे सामना रद्द करण्यात आल्याचेही पाहायला मिळते. अशी घटना होणे हे यजमान संघासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट समजली जाते. पण, क्रिकेट इतिहासात आतापर्यंत असे क्वचितच घडले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३वेळा अशा घटना घडल्या, ज्यामुळे टॉस झाल्यानंतर मध्येच खराब खेळपट्टीमुळे सामना रद्द करण्यात आला आहे.
या लेखात त्या ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा आढावा घेण्यात आला आहे, जे चालू झाल्यानंतर खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आले. 3 matches abandoned due to poor pitch.
भारत विरुद्ध श्रीलंका, १९९७ –
डिसेंबर १९९७ला भारत विरद्ध श्रीलंका संघात ३ सामन्यांची वनडे मालिका झाली होती. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ इंदोर येथे पोहोचले होते. तेथील नेहरू स्टेडियमवरील खेळपट्टी सामना सुरु होण्यापुर्वी पूर्णपणे कोरडी होती.
श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, खेळपट्टीवर चेंडू मोठ्या प्रमाणात बाउन्स होऊ लागल्याने फलंदाजांना खेळणे कठीण जाऊ लागले. शिवाय खेळाडूंना दुखापत होण्याचेही संकेत दिसू लागले होते. त्यामुळे ३ षटके १ बाद १७ धावांवर तो सामना रद्द करण्यात आला. पुढे त्या खेळपट्टीच्या दुुसऱ्या बाजूला असणाऱ्या खेळपट्टीवर, नाराज दर्शकांसाठी २५ षटकांचा फ्रेंडली सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व सचिन तेंडूलकर करत होता.
वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, १९९८ –
१९९८ला इंग्लंड संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. यावेळी दोन्ही संघात ६ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडने फलंदाजी करण्याचा निर्णय गेतला होता. सुरुवातीच्या षटकात इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक उसळी असल्याचे जाणवत होते. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचे चेंडूदेखील काही फलंदाजांना लागले.
म्हणून ५५ मिनिटे खेळण्यात आलेला तो सामना ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रद्द करण्यात आला. ३ बाद १७ धावांवर तो सामना संपुष्टात आला होता.
भारत विरुद्ध श्रीलंका, २००९ –
डिसेंबर २००९मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका संघातील ५वा वनडे सामना दिल्ली येथे खेळण्यात आला होता. यावेळी दिल्लीतील फिरोज शहा कोटला स्टेडियमच्या नूतनीकरणानंतर सामन्याची सुरुवात झाली होती. तरीही खेळपट्टीवर अधिक उसळी आणि वेगाने चेंडू येताना दिसून लागले.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्रीलंका संघ फलंदाजी करत होता. मात्र, काही चेंडू फलंदाजांच्या खूप वरून गेले. तर, काही जमिनीलगत लागून जात होते. श्रीलंका संघ २४व्या षटकात ५ बाद ८३ धावांवर होता. काही फलंदाजांना दुखापती झाल्याचेही दिसून आल्याने, सामना रेफरी आणि पंचांनी चर्चा करून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
ट्रेंडिंग घडामोडी-
धोनी- रोहित कर्णधार म्हणून संघातील खेळाडूंवर ठेवतात विश्वास तर कोहली…
५ अतिशय विचित्र गोलंदाजी शैली, ज्या पाहुन प्रेक्षकांना यायचे जोरदार…
क्रिकेट इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारे ३ गोलंदाज