रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी हा आयपीएलच्या महत्त्वाच्या संघांपैकी एक आहे. जरी आरसीबीने अद्याप एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नसले, तरी संघाची फॅन फॉलोव्हिंग खूप जास्त आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आरसीबीमध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससारखे खेळाडू खेळतात, ज्याला जगभरातील चाहत्यांनी पसंती दिली आहे.
आरसीबीचा संघ ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचली आहे, पण तिन्ही वेळा त्यांचा पराभव झाला आहे. २००९ मध्ये आरसीबी संघाने सर्वात प्रथम अंतिम फेरीत प्रवेश केला पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर २०११ मध्ये संघाने डॅनियल व्हिटोरी आणि २०१६ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात अंतिम फेरी गाठली होती पण त्यांना जेतेपद मिळवता आले नाही.
आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू आरसीबीकडून खेळले आहेत, ज्यांनी अनेक वेळा संघाला जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. परंतु त्यांना विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. पण यावर्षी आरसीबी संघात काही दिग्गज खेळाडू सामील झाले आहेत. त्यामुळे विराट आणि आरसीबी संघाला या खेळाडूंकडून बरीच अपेक्षा असेल. म्हणूनच या लेखात अशा ३ आरसीबी खेळाडूंबद्दल चर्चा करू जे यावर्षी आरसीबीकडून खेळताना आपल्या संघाला आयपीएल २०२० चे विजेते मिळवून देण्यास सक्षम आहेत.
ख्रिस मॉरिस (Chris Morris)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२०च्या लिलावाआधी मार्कस स्टोईनिस आणि कॉलिन डी ग्रँडहॉम या दोन परदेशी अष्टपैलू खेळाडूंना संघातून मुक्त केले. त्यानंतर आरसीबीला संघासाठी अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता होती, जो गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये योगदान देऊ शकेल. म्हणूनच ख्रिस मॉरिस हा संघासाठी एक चांगला पर्याय असल्याचे दिसून आले आणि आरसीबी संघाने त्यावर बोली लावली आणि त्याला आपल्या संघाशी जोडले.
मॉरिस गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करुन संघाला विजय मिळवून देऊ शकतो. अशी कामगिरी त्याने अनेकदा केली आहे. ख्रिस मॉरिसच्या नावावर आयपीएलच्या इतिहासातील वेगवान स्ट्राइक रेटने फलंदाजीचा विक्रम आहे. ज्याने आयपीएल २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरगिजंट विरूद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून ९ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३८ धावा फटकावल्या होत्या. यामुळे दिल्लीने २० षटकांत २०५ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात आरपीएस संघ केवळ १०८ धावांवर बाद झाला होता.
मॉरिसने आयपीएलमध्ये खेळलेल्या ६१ सामन्यांमध्ये ७.९८ च्या इकॉनॉमी रेटने ६९ बळी मिळवले आहेत आणि फलंदाजीमध्ये त्याने १५७.६२ च्या स्ट्राइक रेटने ५१७ धावा केल्या आहेत. मागचा हंगाम जरी मॉरिससाठी इतका चांगला गेला नसला, तरीही हा खेळाडू आपल्या कामगिरीमुळे संघाला विजयी बनविण्यास सक्षम आहे.
ऍरॉन फिंच (Aaron Finch)
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू ऍरॉन फिंच २०१९ च्या आयपीएलमध्ये सहभागी झाला नव्हता. मात्र, त्याची आत्तापर्यंतची आयपीएल कारकीर्द बरीच नेत्रदीपक ठरली आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांकडून खेळणारा खेळाडू आहे. २०१४ च्या आयपीएलमध्ये त्याने वयक्तिक सर्वाधिक ८८ धावा केल्या असून, त्याने आतापर्यंत ७५ आयपीएल सामन्यात १३०.६९ च्या स्ट्राईक रेटने एकूण १७३७ धावा केल्या आहेत. यावेळी हा खेळाडू आरसीबीकडून खेळताना दिसेल.
तो सध्या ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्वात करत असून त्याचा फॉर्मही उत्कृष्ट आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून मर्यादीत षटकांमध्ये सातत्याने धावा करत आहे. फिंचला आक्रमक खेळणे आणि गोलंदाजांवर दबाव राखणे कायम आवडते. तो आपल्या संघासाठी काही षटके गोलंदाजीही करू शकतो.
म्हणूनच हा अनुभवी खेळाडू आयपीएल २०२० मध्ये चमकदार कामगिरी करुन, आरसीबीला आयपीएल १३ व्या हंगामाचा विजेता संघ बनवू शकतो.
केन रिचर्डसन (Ken Richardson)
ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज केन रिचर्डसन २०१६ च्या आयपीएल हंगामात शेवटचा सामना खेळला होता. त्याने आयपीएलच्या १४ सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. जिथे त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय बिग बॅशमध्ये त्याने ८ पेक्षा कमी इकॉनमीने ५९ सामन्यांत ७३ विकेट्स घेतल्या आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळे आरसीबीने या युवा खेळाडूला त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. यावर्षी या खेळाडूकडून संघाला मोठ्या आशा असतील कारण आरसीबी संघाची गोलंदाजी कायमच कमकुवत दिसली आहे.
म्हणूनच आरसीबी संघात केनला आपले स्थान निश्चित करण्याची चांगली संधी असेल. या खेळाडूने बीबीएल आणि त्याच्या राष्ट्रीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ यष्टीरक्षक; एमएस धोनी आहे या स्थानी
२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य
पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जीने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीला लॉर्ड्सवर क्लिन बोल्ड करण्याची स्वप्ने पाहणारी कोण आहे ही महिला?
विराट कोहलीला राजस्थान रॉयल्समध्ये घेऊ, पण फक्त एका अटीवर
भारतीय क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडचा पीपीई किटमध्ये डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल