टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान क्रिकेट टीम सहभागी होणार आहे, मात्र भारतविरुद्ध 15 फेब्रुवारीला होणारा ग्रुप लीग सामना पाकिस्तान बॉयकॉट करणार आहे. या निर्णयाला पाकिस्तान सरकारने मंजुरी दिली असून, ही घोषणा बांग्लादेशच्या जागी स्कॉटलंडला सामील केल्याच्या निर्णयावर असलेला विरोध मानला जात आहे.
पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगा याने या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, संघ बोर्ड आणि सरकारच्या आदेशांचे पालन करेल. त्याने स्पष्ट केले की, संघाचा हा निर्णय नसून, सरकार आणि क्रिकेट बोर्डच्या सूचनांनुसार त्यांनी खेळायचे किंवा न खेळायचे ठरवले आहे. सलमान आगा म्हणाला, “हो, आम्ही उरणार, पण हा आमचा निर्णय नाही. सरकार आणि बोर्ड जे सांगेल, आम्ही तेच करणार आहोत.”
बांग्लादेशने सुरक्षा कारणांचा हवाला देत आपला भारतविरुद्धचा सामना श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, परंतु आयसीसीने त्यास नकार दिला. त्यानंतर पाकिस्तान बोर्डने आपल्या संघाच्या सहभागाचे पुनरावलोकन करणार असल्याचे सांगितले. सरकारने सोशल मिडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तान क्रिकेट टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकते, पण भारतविरुद्ध 15 फेब्रुवारीला होणाऱ्या मॅचमध्ये मैदानावर उतरणार नाही.
सलमान आगा याने पुढे सांगितले की, पाकिस्तान टीम बाकी सर्व सामने खेळेल, परंतु भारतविरुद्ध मॅचसंदर्भातील आदेशांचे काटेकोर पालन करेल. त्याने म्हटले, “संघ सरकार आणि बोर्डच्या सूचनांचे पालन करेल. आम्ही ज्या आदेशांनुसार खेळतो, त्याप्रमाणे खेळू आणि बाकी काही करू शकत नाही.”
या निर्णयामुळे स्पर्धेच्या ग्रुप ए मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांचे निकाल आणि पॉइंट्सवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आयसीसीकडून पाकिस्तानवर विविध कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये आर्थिक दंड, द्विपक्षीय मालिका प्रतिबंध आणि आगामी टुर्नामेंट्समध्ये सहभागी होण्यावर बंदी यांचा समावेश असू शकतो.






