कुठल्याही क्रिकेटरचं स्वप्न असतं की त्याने भरपूर वर्षांसाठी देशाकडून क्रिकेट खेळावं असं. यातून काही क्रिकेटपटू दीर्घ काळासाठी खेळू शकतात तर काही खेळाडू खूप कमी काळ खेळतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. तो २४ वर्षे भारताकडून खेळला आणि बरेच विक्रम त्याने केले.
पण सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सारखे खूप कमी खेळाडू होऊन गेलेत. कारण एवढे दिवस खेळूनसुद्धा त्याचा क्रिकेटसाठीचा उत्साह आणि फॉर्मवर कसलाही फरक नाही पडला. पण याउलट काही खेळाडू लवकर निवृत्ती घेतात. यामागे बरीच काही कारणं असतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाच काही खेळाडूंनी लवकर निवृत्ती घेतली, परंतु त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना अजून खेळण्याची अपेक्षा होती. या लेखात आपण जाणून घेऊया, अश्याच ३ खेळाडूंबद्दल ज्यांनी २०२० मध्ये निवृत्ती घेतली; परंतु त्यांनी अजून खेळायला हवं होतं. या जाणून घेऊया या यादीत कोण कोण आहेत?
३ महान खेळाडू, ज्यांनी आताच निवृत्ती नव्हती घ्यायला पाहिजे होती
१. सुरेश रैना
या यादीतलं पहिलं नाव भारताच्या डाव्या हाताचा फलंदाज सुरेश रैनाचं आहे. सुरेश रैना (Suresh Raina) उत्कृष्ट खेळाडू होता. त्याने मर्यादित षटकांत चमकदार कामगिरी केली. त्याने फिनिशरची भूमिका बजावली आणि विस्फोटक खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आहे.
सुरेश रैना भारतीय संघाकडून शेवटचा सामना २०१८ मध्ये खेळला आणि त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं. त्याला टी-२० विश्वचषक खेळायची इच्छा होती, पण त्याने १५ ऑगस्ट २०२०लाच निवृत्ती जाहीर केली. ज्यादिवशी एमएस धोनीने निवृत्ती जाहीर केली त्याचदिवशी रैनाने सुद्धा निवृत्ती जाहीर केली.
सुरेश रैनाचं वय सध्या ३५ आहे आणि तो खेळण्यास तंदुरुस्त आहे त्यामुळे त्याने अजून खेळायला हवं होतं.
२. एमएस धोनी (MS Dhoni)
भारतीय संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने (Mahendra Singh Dhoni) निवृत्ती जाहीर करताच करोडो चाहत्यांचं मन दुखावलं गेलं होतं. धोनीचे जगभरातले चाहते या निर्णयापासून खुश नव्हते.
धोनीने २०१९ वनडे विश्वचषकानंतर एकही सामना खेळला नव्हता. त्याने पुढे प्रत्येक मालिकेसाठी स्वतःला अनुपलब्ध ठेवलं. अखेर १५ ऑगस्ट २०२०ला त्याने निवृत्ती जाहीर केली. त्याचं क्रिकेटमधलं प्रदर्शन बघता त्याने आता निवृत्ती नव्हती घ्यायला पाहिजे होती.
३. शेन वॉटसन
ऑस्ट्रेलियाच्या या सलामीवीर फलंदाजाने आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे तो जगभरात होणाऱ्या टी-२० लीग खेळत होता. पण त्याने आयपीएल २०२० नंतर सगळ्याच प्रकारातून निवृत्ती घेतली.
शेन वॉटसन (Shane Watson) आयपीएलच्या १३व्या हंगामात चांगलं प्रदर्शन नाही करू शकला. कदाचित या कारणामुळेच त्याने निवृत्ती घेतली असेल. त्यामुळे वॉटसनच्या चाहत्यांचं म्हणणं होतं की, त्याने फारच लवकर निवृत्ती जाहीर केली.
महत्त्वाच्या बातम्या-
- टीम इंडियासाठी ‘फायनल फ्रंटियर’ बनलाय दक्षिण आफ्रिका दौरा; यावेळी विजयाची सर्वाधिक संधी
- सचिन-द्रविडने केलेले ‘महापराक्रम’; मात्र, संघावर ओढवलेली पराभवाची नामुष्की; वाचा ‘त्या’ विशेष सामन्याबाबत
- नयन मोंगिया: यष्टीरक्षक म्हणून ‘तो’ अव्वल होता, मात्र संथ खेळ्यांनी संपवली कारकीर्द