---Advertisement---

IND vs NZ: चौथ्या टी20 मध्ये भारताने टॉस जिंकला, ईशान किशन बाहेर; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

On: बुधवार, जानेवारी 28, 2026 6:44 PM
---Advertisement---

आज विशाखापट्टणममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथा टी20 सामना खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. ईशान किशन अनफिट असल्यामुळे संघाबाहेर असून, त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत आधीच 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. मात्र, तरीही सूर्या ब्रिगेड या सामन्यात कोणतीही ढिलाई न घेता मैदानात उतरणार आहे. टी20 वर्ल्ड कपपूर्वी सुरू असलेल्या या मालिकेत भारतीय फलंदाजांनी दमदार आणि आक्रमक कामगिरी केली आहे. मात्र, फिरकी गोलंदाजी विभाग अपेक्षेप्रमाणे प्रभाव टाकू शकलेला नाही, ही बाब चिंतेची ठरत आहे.

गुवाहाटी येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने केवळ 10 षटकांत 154 धावांचे लक्ष्य पूर्ण करत मोठा विजय मिळवला होता. त्या सामन्यात अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी फलंदाजीत धडाकेबाज खेळी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही या फलंदाजांकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

दोन्ही संघाच्या प्लेइंग 11-

न्यूझीलंड- टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅकॅरी फुल्क्स, मॅट हेन्री, इश सोढी, जेकब डफी

भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---