क्रिकेटच्या विश्वात असे अनेक फलंदाज होते, ज्यांनी धावा तर केल्याच त्याचबरोबर शतके देखील ठोकली आहेत. परंतु, आपणास माहित आहे का असे काही भाग्यवान फलंदाज देखील आहेत, जे वनडे कारकीर्दीत कधीही नाबाद झाले नाही. भारतीय संघातील असे तीन खेळाडू आहे जे वनडे सामन्यात कधीही बाद झाले नाही. परंतु आता ते खेळाडू सर्वांच्या नजरेआड झाले आहे. त्याचबरोबर तिथेच त्यांची कारकीर्द देखील संपली आहे. चला तर पहिल्या असे तीन भारतीय फलंदाज जे कधीही वनडे क्रिकेटमध्ये बाद झाले नाहीत.
1) सौरभ तिवारी
सौरभ तिवारीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा त्याला धोनीचा डुप्लीकेट म्हणून ओळखले जात होते. सौरभ तिवारीचे लांब केस पाहून लोक त्याची तुलना धोनीशी करत असत. सौरभ तिवारीने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले होते. त्याच बरोबर सौरभ तिवारीने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सौरभ तिवारीने भारतीय संघासाठी फक्त तीन वनडे सामने खेळले होते. त्यामध्ये तो फक्त दोन डावांमध्ये फलंदाजी करू शकला. या दोन्ही डावांमध्ये सौरभ तिवारी नाबाद राहिला. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
2) फैज फजल
फैज फजलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष आकर्षित केले होते. त्यानंतर त्याला २०१६ साली भारतीय संघामध्ये स्थान देखील मिळाले होते. परंतु, फैज फजलने भारतीय संघासाठी फक्त एकच वनडे सामना खेळला आहे. साल २०१६ मध्ये जिम्बाब्वे विरुद्ध खेळलेल्या वनडे सामन्यांमध्ये फैज फजलने नाबाद ५५ धावांची खेळी केली होती. या उत्कृष्ट खेळी नंतरही त्याला संघात स्थान मिळाले नाही.
3) भरत रेड्डी
भरत रेड्डीचे नाव आजच्या युवा पिढीला माहिती नसेल. पण भरत रेड्डीला भारताकडून फक्त तीन वनडे सामने खेळले आहेत. भरत रेड्डी यांनी १९७८ पासून ते १९८१ पर्यंत भारतासाठी तीन वनडे सामने खेळले होते. त्यात भरत रेड्डी यांना फक्त दोनदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. ते दोन्ही वेळा नाबाद राहिले. यानंतर भरत रेड्डी यांना भारतीय संघात स्थान दिले गेले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० च्या जमान्यात ५७ वर्षापासून अबाधित आहे ‘हा’ विश्वविक्रम, सेहवाग पोहोचला होता सर्वात जवळ
विक्रम मोडण्याच्या शर्यतीत स्मिथची एंट्री; श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावत मार्क वॉला टाकले मागे
मराठीत माहिती- क्रिकेटर व्यंकटपथी राजू