ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या महिला अंडर-19 त्रिकोणी मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. ही मालिका टी20 आणि 50 षटकांच्या वनडे फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. टी20 मालिकेला 19 सप्टेंबरपासून तर वनडे मालिकेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
जर तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 महिला संघावर नजर टाकली, तर क्रिकेटमध्ये भारताचं वर्चस्व किती आहे, हे स्पष्टपणे दिसून येतं. खरं तर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं जाहीर केलेल्या महिला अंडर-19 संघात तीन भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश आहे. रिब्या स्यान, समारा दुल्विन आणि हसरत गिल अशी या खेळाडूंची नावं आहेत. या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू क्रिस्टन बीम्स यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आपल्या निवेदनात म्हटलं की, “रिब्या स्यान, समारा दुल्विन आणि हसरत गिल यांचा संघात समावेश केल्यानं ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील वाढती विविधता आणि भारतीय क्रिकेट वारशाचं योगदान दिसून येतं.”
ऑस्ट्रेलियाचा टी20 संघ – बोनी बेरी, काओइमे ब्रे, एला ब्रिस्को, मैगी क्लार्क, समारा डुल्विन, लुसी फिन, हसरत गिल, लुसी हैमिल्टन, एमी हंटर, एलेनोर लारोसा, इनेस मैकॉन, रिब्या स्यान, टेगन विलियमसन, एलिजाबेथ वर्थली, हेले जौच
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ – बोनी बेरी, काओइमे ब्रे, एला ब्रिस्को, मैगी क्लार्क, समारा डुल्विन, लुसी फिन, हसरत गिल, एमी हंटर, एलेनोर लारोसा, इनेस मैककॉन, जूलियट मॉर्टन (एनएसडब्ल्यू) रिब्या सियान, टेगन विलियमसन, एलिजाबेथ वर्थली, हेले जौच
महिला अंडर 19 टी20 तिरंगी मालिकेचं वेळापत्रक
19 सप्टेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड
20 सप्टेंबर – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका
22 सप्टेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका
24 सप्टेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड
25 सप्टेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका
26 सप्टेंबर – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका
महिला अंडर 19 एकदिवसीय तिरंगी मालिकेचं वेळापत्रक
30 सप्टेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका
1 ऑक्टोबर – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका
2 ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड