लंडनचं ‘लॉर्ड्स ग्राउंड’ हे क्रिकेटचं ‘मक्का’ मानलं जाते. या मैदानाचा इतिहास खूप जुना आहे. जे खेळाडू येथे चांगली कामगिरी करतात, त्यांची नावं या मैदानाच्या सन्मान फलकावर नोंदवली जातात. शतक झळकावल्यानंतर फलंदाजांना सन्मानफलकावर नाव नोंदवण्याची संधी मिळते, तर गोलंदाजांना ही सुवर्णसंधी एका डावात पाच बळी घेतल्यानंतर मिळते.
अलीकडेच लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी खेळली गेली. या कसोटीत इंग्लिश खेळाडू गस ॲटकिन्सननं जबरदस्त कामगिरी केली. त्यानं प्रथम शतक झळकावलं आणि नंतर आपल्या पाच विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. अशाप्रकारे लॉर्ड्स कसोटीत एका डावात शतक आणि पाच बळी घेण्याचा पराक्रम करणाऱ्या केवळ तीन खेळाडूंच्या यादीत ॲटकिन्सनचा समावेश झाला आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला या 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.
(3) गस ॲटकिन्सन – गस ॲटकिन्सननं नुकतेच इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केलं. त्यानं अवघ्या काही सामन्यांमध्ये लॉर्ड्सवर आपल्या कामगिरीनं नाव कमावलं. ॲटकिन्सननं इंग्लंडच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावलं. त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 118 धावा केल्या, तर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 62 धावांत 5 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे लॉर्ड्सवरील एकाच कसोटीत शतक आणि पाच बळी घेणारा तो तिसरा खेळाडू ठरला.
(2) इयान बोथम – या यादीत इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू इयान बॉथम हा दुसरा खेळाडू आहे. लॉर्ड्स कसोटीत एका डावात शतक आणि पाच बळी घेण्याचा पराक्रम बोथमनंही केलाय. 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यानं 108 धावांची खेळी खेळली आणि त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजीत 8/34 अशी कामगिरी केली.
(1) विनू मंकड – लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात एका डावात शतक झळकावणारा आणि नंतर एका डावात पाच विकेट घेणारा भारतीय क्रिकेटचा दिग्गज विनू मंकड हा क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू होता. 1952 मध्ये याच मैदानावर त्यानं इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 196 धावांत 5 बळी घेतले होते आणि त्यानंतर 184 धावांची शानदार खेळीही खेळली होती.
हेही वाचा –
एकेकाळी आयपीएलची मोठी ऑफर नाकारली, आता खाजगी कंपनीत नोकरी करतो हा क्रिकेटर
इंग्लडच्या विजयाचा दुसऱ्याच संघाला फायदा, WTC गुणतालिकेत मोठा फेरबदल; भारताचं स्थान कितवं
16 वर्षीय फिरकीपटूची कमाल, क्रिकेटमधील 159 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!