आयपीएल २०२२ हंगाम रोमांचक वळणावर आला आहे आणि अशातच सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन त्याच्या मायदेशात परतला आहे. विलियम्सनचे दुसरे आपत्य जन्माला आल्यामुळे तो चालू हंगामातून रजा घेत न्यूजलींडला परतला आहे. विलियम्सन त्याच्या बाळाला भेटण्यासाठी गेला, पण हैदराबात संघाच्या चाहत्यांची चिंता मात्र वाढली आहे. त्याच्या अनुपस्थितीत संघाला नवीन कर्णधाराची आवश्यकता निर्माण झाली आहे. चला तर नजर टाकून हैदराबाद संघातील तीन अशा खेळाडूंवर, जे विलियम्सनच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळू शकतात.
१. भुवनेश्वर कुमार –
सनरायझर्स हैदराबादचा सर्वात अनुभवी खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshear Kumar). भुवनेश्वरने आयपीएलमध्ये १४० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्याने यापूर्वी देखील हैदराबाद संघाचे नेतृत्व केले आहे. आयपीएल २०१९ मध्ये केन विलियम्सन (Kane Williamson) अनुपस्थितीत असताना त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले गेले होते. एवढेच नाही, तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे उपकर्णधारपद देखील भूषवले आहे. अशात विलियम्सनंतर दुसऱ्या कोणत्या खेळाडूला कर्णधार बनवायचे झाले, तर भुवनेश्वरची दावेदार भक्कम आहे.
२. निकोलस पूरन –
सनरायझर्स हैदराबदचा दमदार फलंदाज निकोलस पूरन (Nicolas Pooran) नुकताच काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार बनला आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात हैदराबादने त्याला खरेदी करण्यासाठी तब्बल १०.७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. चालू हंगामात खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत १५० च्या स्ट्राईक रेटसह ३०१ धावा केल्या आहेत. अशात हैदराबादचे संघ व्यवस्थापन पूरनला देखील संघाचा कर्णधार बनवू शकते.
३. एडेन मार्करम –
केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत हैदराबादचे नेतृत्व दक्षिण अफ्रिकी फलंदाज एडन मार्करम (Aiden Markram) याच्या हातात देखील दिले जाऊ शकते. एडेन मार्करमने २०१४ साली दक्षिण अफ्रिकेच्या १९ वर्षाखालील संघाचे नेतृत्व केले होते. त्याने १९ वर्षाखालील विश्वचषकात स्वतःच्या संघाला विजय मिळवून दिला होता. एवढेच नाही, तर २०१८ साली फाफ डू प्लेसिसच्या अनुपस्थितीत त्याने भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण अफ्रिका संघाचे नेतृत्व केले होते. अशात त्याच्याकडे देखील कर्णधारपद सांभाळण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता नक्कीच आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहितच्या भन्नाट षटकारानंतर पत्नी रितीकाची खुलली कळी, सारानेही टाळ्या वाजवत केलं कौतुक
आगामी टी२० मालिकांसाठी वीवीएस लक्ष्मण बनणार टीम इंडियाचा महागुरू, मग द्रविडचं काय? वाचा
नो बॉल, वाईड, पुन्हा नो बॉल; आधी व्हिलन बनलेला उमरान मलिक शेवटी ‘असा’ ठरला हिरो