---Advertisement---

अजून कोणाकडून नव्हे तर ‘अंपायर’कडून उमरान मलिक शिकलाय ‘पंच सेलिब्रेशन’ची स्टाईल

On: बुधवार, मे 18, 2022 10:47 PM
Umran-Mailk
---Advertisement---

सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याने मंगळवारी (१७ मे) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात देखील महत्वाचे योगदान दिले आणि संघाला विजय मिळवून दिला. सनरायझर्स हैदराबादने तीन धावांनी हा सामना जिंकला. सामन्यात विकेट घेतल्यानंतर उमरानने केलेले ‘पंच सेलिब्रेशन’ चर्चेचा विषय ठरले. सामना संपल्यानंतर त्याने या सेलिब्रेशनविषयी महत्वाचा खुलासा केला.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात उमरान मलिक (Umran Malik) याने ३ षटके टाकली आणि यामध्ये २३ धावा खर्च करून ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. उमरानने इशान किशन, डॅनियल सॅम्स आणि तिलक वर्मा या महत्वाच्या खेळाडूंना तंबूत धाडले. या तीन विकेट्स हैदराबादला मिळालेल्या विजयात महत्वाच्या ठरल्या. सामना संपल्यानंतर त्याने सांगितले की, एका पंचाकडून त्याने हे पंच सेलिब्रेशन शिकले आहे, जे तो विकेट घेतल्यानंतर करताना दिसतो.

मुंबईला मात दिल्यानंतर उमरान भुवनेश्वरसोबत बोलताना म्हणाला की, “जेव्हा आम्ही नेट्समध्ये गोलंदाजी करतो, तेव्हा संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन पंचाच्या भूमिकेत असतात. मी नेट्समध्ये जेव्हा विकेट घेतो, तेव्हा स्टेन अशाच पद्धतीने पंच सेलिब्रेशन करतात आणि मी त्यांना पाहूनच हे करायला सुरू केले. आता ही माझी सवय बनली आहे.”

दरम्यान, उमरानने मागच्या आयपीएल हंगामात त्याच्या गुणवत्तेची थोडीशी झलक दाखवली होती, पण चालू हंगामातील त्याचे प्रदर्शन पाहून दिग्गज हैराण आहेत. त्याने चालू हंगामातील १३ सामन्यांमध्ये ४७ षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ८.९३ च्या इकोनॉमी रेटने धावा खर्च केल्या आणि २१ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ६ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने मर्यादित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १९० धावा केल्या. परिणामी हैदराबादने अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

आगामी टी२० मालिकांसाठी वीवीएस लक्ष्मण बनणार टीम इंडियाचा महागुरू, मग द्रविडचं काय? वाचा

नो बॉल, वाईड, पुन्हा नो बॉल; आधी व्हिलन बनलेला उमरान मलिक शेवटी ‘असा’ ठरला हिरो

अर्जुनच्या आयपीएल पदार्पणाची प्रतिक्षा संपणार? शेवटच्या सामन्यासाठी कर्णधार रोहितकडून महत्त्वाचे संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---