गेल्या 11 वर्षांपासून तमाम भारतीय चाहते ज्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला! शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. मात्र या विजयासोबतच भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमीही आली.
वास्तविक, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. युवा खेळाडूंना या फॉरमॅटमध्ये संधी मिळावी यासाठी कोहलीनं हा निर्णय घेतला. असं असलं तरी कोहली वनडे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये खेळत राहणार आहे. त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो की, टी20 संघात विराट कोहलीचा जागा कोणता खेळाडू घेणार? या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे भारताच्या टी20 संघात विराट कोहलीची जागा घेऊ शकतात.
(3) शुबमन गिल – 24 वर्षीय युवा फलंदाज शुबमन गिलमध्ये क्षमतेची कमतरता नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, गिलला आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये फारशी संधी मिळालेली नाही. आता कोहलीच्या अनुपस्थितीत तो उत्कृष्ट कामगिरीनं भारताच्या टी20 संघात आपलं स्थान निश्चित करू शकतो. शुबमन गिलनं भारतासाठी खेळताना 14 टी20 सामन्यांमध्ये 25.76 च्या सरासरीनं 335 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच सलामीसह तिसऱ्या क्रमांकावर खेळताना देखील गिलचा रेकॉर्ड खूप चांगला आहे.
(2) ऋतुराज गायकवाड – भारतीय संघात विराट कोहलीची जागा मराठमोळा ऋतुराज गायकवाड घेऊ शकतो. गायकवाडनं भारतासाठी आतापर्यंत 19 टी20 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 35.71 च्या सरासरीनं 500 धावा केल्या आहेत. ऋतुराजला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली, तेव्हा-तेव्हा त्यानं त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. याशिवाय तो आयपीएलमध्ये महेद्रसिंह धोनीच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला असून त्याला दबावाच्या परिस्थितीत कसं खेळायचं, ही कला चांगली अवगत आहे.
(1) संजू सॅमसन – विराट कोहलीच्या जागी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनचाही टीम इंडियामध्ये समावेश केला जाऊ शकतो. सध्या रिषभ पंतमुळे सॅमसनला संघात स्थान मिळत नाही, परंतु आता कोहली गेल्यानंतर तो संघात सहज फिट होऊ शकतो. सॅमसन वेगवान धावा काढण्यासह त्याच्या नेतृत्व गुणांसाठी देखील ओळखला जातो.
महत्त्वाच्या बातम्या –
“आता मी बेरोजगार झालो”, राहुल द्रविड यांनी जाता-जाता दिली भावनिक प्रतिक्रिया
रोहितच्या अनोख्या सेलिब्रेशनचं ‘मेस्सी’शी कनेक्शन! या खेळाडूनं दिलं होतं खास ट्रेनिंग
सूर्यकुमार यादवच्या एका कॅचमुळे फिरला सामना! जय शाहंच्या हस्ते मिळाला विशेष पुरस्कार