ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटी संपल्यानंतर अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या घोषणेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. अश्विननं तसे त्याच्या निवृत्तीचे संकेत दिले नव्हते. त्यामुळे त्यानं हा निर्णय अचानकच घेतला असं म्हणता येईल.
आर अश्विननं वर्षानुवर्ष टीम इंडियाच्या फिरकी विभागाची धुरा सांभाळली. त्यानं भारतासाठी अनेक कसोटी सामन्यांमध्ये मॅच विनिंग कामगिरी केली आहे. परदेशात तो तेवढा प्रभावी राहिला नसला, तरी देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याच्यापेक्षा मोठा मॅचविनर कोणीही झालेला नाही. त्यामुळे आता अश्विनच्या निवृत्तीनंतर त्याचा बदली खेळाडू शोधण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे. या लेखात आम्ही तुम्हाला अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे भारताच्या कसोटी संघात अश्विनचा पर्याय ठरू शकतात.
(3) तनुष कोटियन – गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा युवा अष्टपैलू तनुष कोटियनचं नाव देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलंच चर्चेत आहे. त्यानं रेड बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आपली अष्टपैलू क्षमता दाखवली आहे. तनुष हा ऑफ ब्रेक गोलंदाज असून तो गरजेनुसार फलंदाजीही करतो. अशा परिस्थितीत अश्विनला पर्याय म्हणून त्याला कसोटी संघात स्थान मिळू शकतं. नुष कोटियननं त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत आतापर्यंत 33 सामन्यांत 101 बळी घेतले असून 1525 धावा केल्या आहेत.
(2) कुलदीप यादव – अश्विन आणि रवींद्र जडेजा या अनुभवी जोडीमुळे चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला अनेक वेळा चांगली कामगिरी करून देखील प्लेइंग 11 मधून बाहेर बसावं लागलं. अशा स्थितीत आता अश्विनच्या निवृत्तीनंतर कुलदीपचं नशीब चमकू शकतं. आता तो कसोटी संघात नियमित खेळताना दिसू शकतो.
(1) वॉशिंग्टन सुंदर – रविचंद्रन अश्विन याचा उत्तराधिकारी म्हणून तामिळनाडूच्या वॉशिंग्टन सुंदरचं नाव अग्रस्थानी आहे. सुंदरनं अलीकडच्या काळात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत भरीव योगदान दिलंय. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं विकेट्स घेतल्या असून बॅटनंही चमकदार कामगिरी केली आहे. सुंदरनं नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत अश्विनला पर्याय म्हणून टीम इंडिया निश्चितपणे सुंदरचा विचार करू शकते.
हेही वाचा –
अश्विनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने शेअर केला एक खास व्हिडिओ! अश्विन म्हणाला, “आयुष्य ही खरोखरच…”
‘त्याच्या निर्णयावर खूप…’, आर अश्विनच्या निवृत्तीवर रोहित शर्माची प्रतिक्रिया
अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केलं, गंभीर-रोहित जोडीवर प्रश्न उपस्थित