इंडियन प्रीमियर लीग ही सध्याच्या घडीला जगातील नामांकित क्रिकेट लीगपैकी एक आहे. या लीगमध्ये अनेक दिग्गज खेळून गेले आहेत. काही खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवली आहे, तर काही खेळाडू असे सुद्धा आहेत, ज्यांच्यावर बीसीसीआयने बंदी लावून देखील, त्यांनी आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे.
आयपीएलमध्ये असे ३ खेळाडू आहेत, ज्यांच्यावर बीसीसीआयने काही सामन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी बंदी घातली होती, पण त्यांनी यशस्वी पुनरागमन करून दाखवले. या लेखात आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.
१. रसिक सलाम-
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे जम्मू आणि कश्मिरचा वेगवान गोलंदाज रसिक सलाम. त्याने २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिलली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. यावेळी तो महागडा ठरला होता. त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. त्याचवर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या १९ वर्षाखालील तिरंगी मालिकेपूर्वी खोटे प्रमाणपत्र जमा करण्याच्या बाबतीत बीसीसीआयने त्याच्यावर २ वर्षांसाठी बंदी लावली होती.
बंदी हटवल्यानंतर त्याला आयपीएल २०२२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. या हंगामात त्याला मुंबईविरुद्ध पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. केकेआरकडून खेळताना आणि आपल्या जून्या फ्रॅंचायझीविरुद्ध खेळताना त्याने ३ षटकात गोलंदाजी करताना १८ धावा दिल्या.
२. रविंद्र जडेजा-
चेन्नई सुपर किंग्सचा सध्याचा कर्णधार रविंद्र जडेजावर बीसीसीआयने २०१० च्या हंगामापूर्वी संपूर्ण मोसमासाठी बंदी लावली होता. त्याच्यावर आरोप करण्यात आले होते की, तो राजस्थान राॅयल्ससाठी खेळत असून इतर संघांच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे.
पण बंदीनंतर साल २०११ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले. त्याला कोची टस्कर्स केरला फ्रॅंचायझीने खरेदी केले. यानंतर २०१२ मध्ये त्याला सीएसकेने सर्वाधिक किंमतने खरेदी केले आणि तेव्हापासून तो या संघाचा महत्त्वाचा भाग आहे. सीएसकेवर दोन वर्षे बंदी असताना तो गुजरात लायन्स संघासाठी खेळला आहे.
३. हरभजन सिंग-
भारताच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेला हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा खेळाडू आहे. त्याने २००८ म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामात त्याने पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज श्रीसंतला कानाखाली मारली होती, यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर ११ सामन्यांसाठी बंदी घातली होती. परंतु, त्याने पुढील हंगामात पुनरागमन केले. हरभजन सिंगने आयपीएलमध्ये मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या संघांकडून खेळताना एकूण १५० विकेट घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
स्वत:च धावला आणि रनआऊटही झाला, तरीही हार्दिकने संघ सहकाऱ्यावर काढला राग; पाहा Video
सहनही होईना अन् सांगताही येईना! सामन्यादरम्यान गुजरातच्या खेळाडूला जोराची लागली, मग काय झालं पाहाच