दिग्गज फिरकीपटू व भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि आताचे प्रशिक्षक रवी शास्त्री या दोघांच्या शिकवण पद्धती वेगवेगळ्या आहे. अनिल कुंबळेची २०१६ मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती, पण भारताचा कर्णधार विराट कोहलीसह झालेल्या वादामुळे त्यानी २०१७ मध्ये प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. २०१७ मध्ये अनिल कुंबळेने भारतीय संघाचे प्रशिक्षणपद सोडल्यानंतर या पदावर रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली.
रवी शास्त्री प्रशिक्षक झाल्यानंतर संघात काही बदल घडल्याचे दिसून आले. काही असे खेळाडू होते, जे कुंबळे प्रशिक्षक असताना संघात होते. पण कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे खेळाडूने अचानक संघातून बाहेर झाले. अशात ३ खेळाडूंचा या लेखात आढावा घेऊ.
१. करुण नायर
दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागनंतर भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात त्रिशतक मारणारा करुण नायर हा एकमेव खेळाडू आहे. २०१७ मध्ये अनिल कुंबळेच्या कार्यकाळात त्यानी या युवा फलंदाजावर विश्वास दाखवला होता, त्या संधीचा करुण नायरने पुरेपूर उपयोग केला होता व ३८१ चेंडूं मध्ये ३०३ धावांची नाबाद खेळी केली होती. पण २०१७ मध्ये रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर हा युवा फलंदाज दुर्लक्षित झाला आणि २०१७ नंतर करूण नायरचे भारतीय संघात परत पुनरागमन झाले नाही.
२. जयंत यादव
भारतीय संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू जयंत यादव हा अनिल कुंबळेने प्रशिक्षकपद सोडल्यानंतर भारतीय संघातून अदृष्य झाला आहे. जयंत यादवने घरगुती क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे व जेव्हाही याला संधी दिली गेली आहे, तेव्हा त्याने निराश केले नाही. साल २०१७ मध्ये भारतीय कसोटी संघात खेळताना जयंतने ४ कसोटींमध्ये ४५.६० च्या सरासरीने २२८ धावा केल्या आहेत व ११ विकेट्सही घेतल्या आहे.
साल २०१६ मध्ये जयंत यादवने भारतीय कसोटी संघात पदार्पण केले होते, त्याच्या तिसऱ्याच सामन्यात त्याने आपले पहिले शतक झळकावले होते. ९ व्या स्थानावर फलंदाजी करताना शतक झळकावणारा तो प्रथम भारतीय फलंदाज ठरला होता. पण रवी शास्त्रीचे प्रशिक्षकपदी येताच जयंत हा भारतीय संघातून नाहीसा झाला व त्याचे भारतीय संघात परत पुनरागमन झाले नाही.
३. अमित मिश्रा
भारतीय संघातील लेग स्पिनचा जादूगर अमित मिश्रा हा रवी शास्त्री प्रशिक्षकपदी येताच भारतीय संघातून गायब झाला. भरतासाठी अनेक वेळा आपल्या फिरकी गोलंदाजीने चांगले प्रदर्शन केले आहे, पण २०१७ नंतर त्याला भारतीय संघात येण्यासाठी संघर्ष करावा लागला. अनिल कुंबळे यांनी अमित मिश्राला २०१६ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये भारतीय संघात संधी दिली होती व त्याने चांगले प्रदर्शनही केले होते. अमित मिश्राने भारतासाठी आता पर्यंत २२ कसोटी सामने खेळले आहे व त्यात ७६ विकेट घेतल्या आहे.
महत्वाच्या बातम्या
असं कोण रेनकोट घालतं! लॉर्ड्स कसोटीत दर्शकाची भलतीच कृती, दर्शकांसह समालोचकही लोटपोट
कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यापुर्वी ‘फॉलोऑन’ नियमाबाबत आयसीसीची मोठी घोषणा, वाचा सविस्तर
‘तो भारताचा थ्रीडी खेळाडू, त्याला संघाबाहेर करणं कठीण’; पाकिस्तानी खेळाडूकडून स्तुती