आयपीएलला २००८ पासून सुरुवात झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत १२ हंगाम पूर्ण झाले. युएईमध्ये सध्या १३ वा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत बऱ्याच विक्रमांची नोंद झाली अनेक विक्रम तुटलेही आहेत. बरेच खेळाडू आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या स्पर्धेत खेळात आहेत.
या स्पर्धेत भारताबरोबरच परदेशातीलही खेळाडू सहभाग घेतात. ८ संघामामध्ये रंगणारी या स्पर्धेत सर्वचसंघ तुल्यबळ आहेत. २००८ च्या पहिल्या आयपीएल हंगामापासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. याशिवाय कायरान पोलार्ड, एमएस धोनी, सुरेश रैना अशी प्रमुख नावेही आहेत जी आतापर्यंत एकाच संघाकडून खेळात आहेत.
या लेखात आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळल्या३ खेळाडूंबद्दल चर्चा करू. विशेष म्हणजे तीनही खेळाडू भारतीय आहेत.
आयपीएलच्या इतिहासात अधिक सामने खेळणारे 3 खेळाडू
३. सुरेश रैना -१९३ सामने
अनुभवी फलंदाज सुरेश रैना हा चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात मोठा सुपरस्टार खेळाडू आहे. जेव्हा सीएसकेचा संघ आयपीएलमधून निलंबित करण्यात आला तेव्हा रैना केवळ दोन हंगामांमध्ये गुजरात लायन्स संघासाठी खेळला होता. पण त्यानंतर पुन्हा त्याला चेन्नई संघाने आपल्या संघात घेतले. मात्र रैनाने आयपीएल २०२० हंगामापूर्वी त्याने आपले नाव मागे घेतले. म्हणून तो यंदाच्या हंगामात खेळताना दिसत नाही.
त्याने या हंगामातून आपले नाव मागे घेत असूनही, सर्वाधिक सामने खेळणार्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुरेश रैना आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकूण १९३ सामने खेळला असून त्यात त्याने ५३६८ धावा केल्या आहेत.
२. रोहित शर्मा -१९७ सामने
रोहित शर्माने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात डेक्कन चार्जर्स संघाकडून केली. यानंतर तो २०११ पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग झाला आणि तेव्हापासून तो मुंबईकडून खेळत आहे. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वात ४ वेळा मुंबई इंडियन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाने इतक्या वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही.
आतापर्यंत त्याने आयपीएल कारकीर्दीत एकूण १९७ सामने खेळले आहेत आणि तो २०० सामने खेळण्याच्या अगदी जवळ आहे. या १९७ सामन्यांत त्याने ५१५८ धावा केल्या आहेत.
१. एमएस धोनी
या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या इतिहासात २०० सामने खेळलेला तो एकमेव खेळाडू आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीने राजस्थान रॉयल्सविरूद्ध मैदानात उतरून २०० वा आयपीएल सामना खेळण्याचा विक्रम केला.
त्याने २०० सामन्यात आतापर्यंत ४५६९ धावा केल्या आहेत तर त्याच्या नेतृत्वाखाली त्याने चेन्नई संघाला ३ वेळा आयपीएल चषक मिळवून दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
-‘सलग तिसऱ्या वर्षी वयस्कर खेळाडूंसह खेळणे कठीण’
-सगळे परवडले पण ‘हा’ नको! अश्विनच्या फिरकीपुढे ‘युनिव्हर्सल बाॅस’चा थरथराट!
ट्रेडिंग लेख –
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
-सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली
-अशा ५ घटना, जेव्हा ‘मुलतानचा सुलतान’ नडलाय थेट पाकिस्तानी खेळाडूंना