इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) २०२२च्या पहिल्या चार मधून एक संघ बाहेर पडला तर एक संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. यामध्ये बुधवारी (२५ मे) झालेल्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने लखनऊ सुपर जायंट्सचा १४ धावांनी पराभव करत त्यांना स्पर्धेबाहेर काढले, तर बेंगलोर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात २७ मे रोजी राजस्थान रॉयल्सशी दोन हात करणार आहे.
आपला पदार्पणाचाच हंगाम खेळणाऱ्या लखनऊ संघाच्या विजेतेपदाच्या आशा बेंगलोरने धूळीस मिळवल्या. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या एलिमिनेटरच्या सामन्यात लखनऊ संघाला काही चुका खूपच महागात पडल्या.
कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत चांगली सुरूवात केली होती. प्रथम गोलंदाजी करताना लखनऊने बेंगलोरचा कर्णधार फाफ डु प्लेसीसला गोल्डन डक केले. तर विराट कोहली पण २५ धावा आणि ग्लेन मॅक्सवेल ९ धावा केल्यावर बाद झाले. यावेळी आशा होती की लखनऊ आपला दबाव कायम ठेवेल, पण खराब क्षेत्ररक्षणाने सामनाच फिरला.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदारने लखनऊच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. १५.३च्या षटकावेळी रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर त्याचा झेल दीपक हुड्डाने सोडला. यावेळी तो ७२ धावांवर होता.
खराब क्षेत्ररक्षण
पाटीदार अगोदर दिनेश कार्तिकला देखील या सामन्यात एक जीवनदान मिळाले होते, तेव्हा तो दोन धावांवर खेळत होता. १५वे षटक मोहसिन खान टाकत असताना पाचव्या चेंडूवर खुद्द राहुलनेच त्याचा झेल सोडला. हे पाहून लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीरची चांगलीच निराशा झाली.
क्विंटन डी कॉकची खराब फलंदाजी
खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत कार्तिक- पाटीदारने लखनऊच्या गोलंदाजांंची चांगलीच धुलाई केली. यामुळे बेंगलोर संघाने लखनऊला २०८ धावांचे लक्ष्य दिले. लखनऊच्या पराभवाच्या कारणामध्ये फलंदाजीसाठी आलेला सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या खराब फलंदाजीचाही समावेश होता. तो ६ धावांवर बाद झाला.
फलंदाजी उत्तम करत बेंगलोरने गोलंदाजीला चांगली सुरूवात केली. मोहमद सिराजने पहिल्या षटकाचा पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला, तर नंतर त्याने पाचव्या चेंडूवर षटकार खेचला पण पुढच्याच चेंडूत तो डू प्लेसिसला झेल देत बाद झाला.
चुकीच्या वेळी दीपक हुड्डा त्रिफळाचीत
डी कॉकची विकेट जाणे ही लखनऊसाठी धोक्याची घंटाच होती. पुढे राहुलने ताबडतोब फलंदाजी करत त्याची एकतर्फी झुंज सुरूच ठेवली. त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हुड्डाने साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा अडसर वानिंदू हसरंगाने त्रिफळाचीत करत दूर केला. त्यापूर्वी हुड्डाने २६ चेंडूत ४ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ४५ धावा केल्या.
ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि मोक्याच्या क्षणाला लखनऊच्या महत्वाच्या विकेट्स पडल्याने त्यांचा विजय अवघड झाला. या आयपीएलमध्ये त्यांनी साखळी सामन्यातील १४ पैकी ९ सामने जिंकत गुणतालिकेत तिसरे स्थान काबिज केले होते.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पोलिसवाला की जॉन सीना? एलिमिनेटरमधील हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल
अब्जावधींना आयपीएल टीम घेणारे ओनर्स कसे कमावतात पैसे?
‘भविष्यात हे नाव…’, एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकणाऱ्या रजत पाटीदारबद्दल विराटचं मन जिंकणारं विधान