भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2022 ची सुरुवात जबरदस्त केली आहे. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून ग्रुप दोनमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. असे असले तरी, चाहत्यांना एका खेळाडूची कमी संघात जाणवली, ती म्हणजे रिषभ पंतची. बीसीसीआय टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यांच्या संघात रिषभ पंत सहभागी आहे, पण त्याला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले. पंतला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवल्यामुळे अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. आपण या लेखात तीन कारणांचा विचार करत आहोत, ज्यामुळे कर्णधार रोहित शर्माने पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले पाहिजे.
डावखुरा फलंदाज असल्यामुळे संघाला मिळणार फायदा
टी-20 विश्वचषकात रिषभ पंत (Rishabh Pant) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्याचे पहिले कारण म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे. सध्या भारतीय संघात पंत आणि अक्षर पटेल (Axar Patel) हे दोनच डावखुरे फलंदाज आहेत. अक्षर पटेल नवखा आहे आणि संघासाठी वरच्या फळीत खेळताना त्याला अडचणी येऊ शकतात. पण पंत मात्र परिस्थिती जशी असेल, तसे प्रदर्शन करू शकतो. प्लेइंग इलेव्हनमध्ये जेव्हा एखादा तरी डावखुरा फलंदाज असतो, तेव्हा संघाचा फलंदाजी क्रम अधिक भक्कम होतो. कारण विरोधी संघाच्या गोलंदाजांना डाव्या आणि उडव्या हाताने फलंदाजी करणाऱ्यांसाठी स्वतःच्या रणनीती वारंवार बदलावी लागते.
ऑस्ट्रेलियात खेळण्याचा पंतकडे चांगला अनुभव –
सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे आहे. रिषभ पंतला टी-20 विश्वचषकात खेळण्याची संधी यामुळेही मिळाली पाहिजे, कारण विश्वचषक ऑस्ट्रेलियात होत आहे. पंतची ऑस्ट्रेलियातील आकडेवारी चांगली राहिली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. पंतला ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीची चांगली जाण आहे. असात कर्णधार रोहित शर्मा अनुभवी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ऐवजी पंतला नक्कीच आजमावू शकतो. भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल देखील सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. चाहते राहुलच्या जागी पंतला संघात घेण्याचीही मागणी करत आहेत.
पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करण्याची ताकत –
टी-20 विश्वचषक म्हणजे पहिल्या चेंडूपासून फलंदाजांना आक्रमक भूमिका घ्यावी लागते. पंत देखील पहिल्या चेंडूपासून मारधाड फलंदाजी करण्यासाठी ओळखला जोतो. तो मागच्या मोठ्या काळापासून भारताचा ‘मॅच विनर’ खेळाडू ठरत आला आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतासाठी अशी भूमिका पार पाडली आहे. भारतीय संघाचा माजी दिग्गज सुरेश रैना देखील संघासाठी मॅच विरनची भूमिका पार पाडत आला होता. आता पंत रैनाची जागा पंत चालवू शकतो. पंतला संधी मिळाली, तर तो टी-20 विश्वचषकात भारताला विजय देखील मिळवून देऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या पराभवामागे भारतीय दिग्गजाचा हात, झिम्बाब्वे संघासाठी पार पाडतात ‘ही’ भूमिका
व्हिडिओ: झिम्बाब्वेविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी, ओक्साबोक्शी रडला पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू