आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही जुने रेकाॅर्ड्स तुटले तर काही नवे रेकाॅर्ड्स बनले. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही रेकाॅर्ड्स असे आहेत, जे मोडीत काढणे कोणत्याही फलंदाजासाठी अशक्य ठरू शकते. या बातमीद्वारे आपण अशाच काही रेकाॅर्ड्सबद्दल जाणून घेऊया, जे मोडणे जवळजवळ अशक्य आहे.
रोहित शर्मा- (13 नोव्हेंबर 2014) या दिवशी रोहित शर्माने (Rohit Sharma) ऐतिहासिक खेळी करून जगाला आश्चर्यचकित केले होते. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 264 धावा करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विश्वविक्रम केला, जो अजूनही कायम आहे.
ब्रायन लारा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या ब्रायन लाराचे (Brian Lara) नाव ऐकले की, त्याच्या 400 धावांची खेळी चाहत्यांच्या मनात येते. वेस्ट इंडिजच्या या दिग्गजाने एप्रिल 2004 मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नाबाद 400 धावा केल्या होत्या. कसोटी सामन्यात 400 धावा करणारा लारा हा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.
एबी डिव्हिलियर्स- एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) जागतिक क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. या दिग्गजाने 2015 मध्ये अशी खेळी खेळली होती, ज्याचा व्हिडिओ पाहून चाहते आजही थक्क होतात. त्याने अवघ्या 31 चेंडूत शतक झळकावले होते. दरम्यान त्याने 16 षटाकारांचा पाउस पाडला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 5.1 षटकांत षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. त्याच दिवशी, हा दिग्गज एकदिवसीय इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला.
महत्त्वाच्या बातम्या-
द गोल्डन आर्म! शेवटच्या षटकात गोलंदाजीला आला अन् श्रेयसने पहिल्याच चेंडूवर काढली विकेट
येत्या काही तासातच भारत-पाकिस्तान संघात होणार अटीतटीची लढत, ‘इथे’ पाहा सामना
मायकल वॉनच्या मुलाची धमाल, 11 विकेट घेऊन एकहाती जिंकवला सामना!