ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग आहे. जगातील अव्वल दर्जाचा कसोटी गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सने आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात केकेआरसाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती . पण कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आयपीएल 2021 स्थगित करण्यात आल्याने पॅट कमिन्स हा त्याच्या मायदेशी परतला आहे .
पण, अलीकडेच बीसीसीआयने युएईमध्ये आयपीएल 2021 चे उर्वरित आयपीएल सामने आयोजित करण्याचे ठरवले आहे. पण पॅट कमिन्स उर्वरित आयपीएल 2021 हंगामात खेळणार नसल्याच्या चर्चा आहेत. असे असताना जर खरंच कमिन्स उर्वरित आयपीएल २०२१ साठी अनुपस्थितीत राहिला, तर त्याच्याऐवजी केकेआर कोणत्या ३ गोलंदाजांना संघात संधी देऊ शकतात हे पाहू.
१. वरुण ऍरॉन:
सिंहभूम येथील 31 वर्षीय भारतीय वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉनने 2011 मध्ये आयपीएलमध्ये करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर आतापर्यंत ऍरॉनने आपल्या 10 वर्षांच्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 50 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये या वेगवान गोलंदाजाने 42 बळी घेतले आहेत.
गेल्या वर्षी आयपीएल 2020 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळणारा वरुण ऍरॉन सध्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाशी संबंधित आहे. म्हणूनच जर फ्रॅंचायझीने पॅट कमिन्सची जागा शोधली तर वरुण ऍरॉन हा एक चांगला पर्याय असू शकतो.
२. शेल्डन कॉट्रेल
जमैकाचा 31 वर्षीय कॅरेबियन वेगवान गोलंदाज शेल्डन कोटरल बराच काळ आयपीएलमध्ये नव्हता. गेल्या वर्षी युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 मध्ये पंजाब किंग्जबरोबर आयपीएल कारकीर्दीची सुरूवात करताना कोट्रेलने 6 सामने खेळले. यादरम्यान, तो फार प्रभावी ठरला नाही आणि केवळ 6 विकेट घेऊ शकला. पण वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली होती.
कोट्रेलला यावर्षी आयपीएल २०२१ च्या लिलावात केकेआरमध्ये स्थान मिळाले आहे. कोलकाता संघ आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात शेल्डन कोट्रेलला पॅट कमिन्सची जागा देण्याची शक्यता आहे.
३. मॅट हेन्री
कँटरबरी क्राइस्टचर्च येथील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने 2017 मध्ये आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली. त्या हंगामात हेन्रीने फक्त 2 सामने खेळले. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात रुजू झालेल्या हेन्रीला अद्याप या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण जर कमिन्स उर्वरित आयपीएल 2021 साठी अनुपलब्ध राहाणार असेल तर हेन्रीला संधी दिली जाऊ शकते. यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे त्याचे दोन्ही बाजूंनी नवीन चेंडू साइड-वे स्विंग करण्याची कौशल्य खूप चांगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हॅलो साउथम्पटन’! भारतीय संघाचा ताफा इंग्लंडमध्ये दाखल, बघा खास फोटो
भारताकडे टी२० विश्वचषकासाठी युझवेंद्र चहल ऐवजी ‘या’ तीन गोलंदाजांचे आहेत पर्याय
जेव्हा फलंदाजीत हातखंडा असलेल्या द्रविडने घेतल्या होत्या २ विकेट्स, फिरवला होता सामना