क्रिकेटच्या इतिसाहात काही नवे रेकाॅर्ड बनले तर काही जुने रेकाॅर्ड तुटले देखील. काही दिग्गज क्रिकेटपटूंनी तर असे रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत, जे कोणत्याही फलंदाजासाठी मोडीत काढणे शक्य नाही. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा (Brian Lara) हा क्रिकेटच्या इतिहासातील विस्फोटक फलंदाजांमध्ये गणला जातो. लाराने 2004 मध्ये इंग्लंडविरूद्धच्या अँटिग्वा कसोटीत नाबाद 400 धावा केल्या होत्या. त्याची 400 धावांची ही खेळी ऐतिहासिक ठरली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत एकाही फलंदाजाला ब्रायन लाराचा (Brian Lara) हा विश्वविक्रम मोडण्यात यश आले नाही. इतकेच नाही, तर लाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 501 धावांची नाबाद खेळी देखील खेळली आहे, जी या फॉरमॅटमध्ये कोणत्याही खेळाडूने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. पण जागतिक क्रिकेटमध्ये असे 3 विस्फोटक फलंदाज आहेत, जे कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावा करून लाराचा विश्वविक्रम मोडू शकतात. या बातमीद्वारे आपण या 3 विस्फोटक फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.
3) हॅरी ब्रूक- इंग्लंडचा स्टार विस्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकने (Harry Brook) अलीकडेच पाकिस्तानविरूद्धच्या कसोटीत वैयक्तिक पहिले त्रिशतक झळकावले. ब्रूकने कसोटी इतिहासातील दुसरे सर्वात जलद त्रिशतक झळकावले. त्याने 310 चेंडूत आपले त्रिशतक पूर्ण केले. तो 322 चेंडूत 317 धावा करून बाद झाला. दरम्यान त्याने 29 चौकारांसह 3 गगनचुंबी षटकार ठोकले. त्याच्या या आक्रमकतेने एक दिवस तो ब्रायन लाराचा कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक 400 धावांचा विश्वविक्रमही मोडू शकतो.
हॅरी ब्रूकने आतापर्यंतच्या 21 कसोटी सामन्यात 56.79च्या सरासरीने 1,931 धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतके, 9 अर्धशतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 317 राहिली आहे.
2) रिषभ पंत- भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतमध्ये (Rishabh Pant) ब्रायन लाराचा कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक 400 धावांचा विश्वविक्रम मोडण्याची ताकद आहे. पंत कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये टी20 क्रिकेटच्या अंदाजात फलंदाजी करतो. पंतने भारतासाठी जगभरातील अनेक कठीण मैदानांवर शानदार खेळी केली आहे. त्यामुळे पंतमध्ये ब्रायन लाराचा कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक 400 धावांचा विश्वविक्रम मोडण्याची क्षमता आहे.
रिषभ पंतने (Rishabh Pant) भारतासाठी 38 कसोटी सामन्यांमध्ये 44.15च्या उत्कृष्ट सरासरीने फलंदाजी करताना 2,693 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 14 अर्धशतकांसह 6 शतके झळकावली आहेत. पंतची कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या नाबाद 159 राहिली आहे.
1) यशस्वी जयस्वाल- भारताचा युवा स्टार विस्फोटक फलंदाज यशस्वी जयस्वालमध्ये (Yashasvi Jaiswal) ब्रायन लाराचा कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक 400 धावांचा विश्वविक्रम मोडण्याची क्षमता आहे. जयस्वालने आतापर्यंत 14 कसोटी सामन्यात 56.28च्या सरासरीने 1,407 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 2 द्विशतकांसह 3 शतके आणि 8 अर्धशतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी दिग्गज क्रिकेटपटूने पृथ्वी शाॅला लिहिले प्रेरणादायी पत्र…!
IND vs SA; अशी असू शकते भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, हे खेळाडू करणार पदार्पण?
VIDEO; ‘या’ महान क्रिकेटपटू पुढे झुकला होता विराट कोहली, स्वत:च सांगितला किस्सा