क्रिकेट हा खेळ पहायला जितका रंजक वाटतो, तो खेळताना त्यापेक्षाही अधिक रंजक वाटतो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपल्याला फलंदाजांची आणि गोलंदाजांची एक वेगळीच शैली पहायला मिळते. कदाचित याच कारणामुळे आता क्रिकेटचे सामने पहिल्यापेक्षा अधिक लोकप्रिय झाले आहेत.
क्रिकेटच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नियमांची कमतरता नक्कीच होती. परंतु आजच्या काळात नियमांचा भडीमार पहायला मिळतो. याच नियमांपैकी एक नियम आहे. तो नियम म्हणजे अर्थातच ‘सुपर ओव्हर’. ‘सुपर ओव्हर’चा नियम वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटसाठी लागू होतो.
या नियमाचा वापर, सामन्यादरम्यान आव्हानाचा पाठलाग करणारा संघ जेव्हा त्या धावांची बरोबरी करतो, त्यानंतर संपूर्ण षटके संपतात किंवा मग संपूर्ण संघ बाद होतो, त्यावेळी निर्णय ‘सुपर ओव्हर’द्वारे घेतला जातो. यामध्ये दोन्ही संघांना एक-एक षटक फलंदाजी करण्यास मिळते. त्या एका षटकात जो संघ सर्वाधिक धावा करतो, त्या संघाला विजय मिळतो.
आपण या लेखात ‘सुपर ओव्हर’मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ३ संघांचा आढावा घेणार आहोत.
‘सुपर ओव्हर’मध्ये सर्वाधिक धावा करणारे ३ संघ- 3 Teams Smashed Most Runs in Super Over In T20 Internationals
१. वेस्ट इंडीज
‘सुपर ओव्हर’मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीज (West Indies) संघाच्या नावावर आहे. विंडीज आणि न्यूझीलंड संघात ऑकलँड येथे डिसेंबर २०१८ला खेळण्यात आलेल्या पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५५ धावा केल्या होत्या. त्यानंतर विंडीज संघाने १५६ धावांचा पाठलाग करताना ८ बाद १५५ धावाच केल्या. त्यानंतर सामना बरोबरीत सुटल्याने सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये गेला.
विंडीजने ‘सुपर ओव्हर’मध्ये प्रथम फलंदाजी करताना १ बाद २५ धावा केल्या होत्या. या २५ धावा एकट्या ख्रिस गेलने (Chris Gayle) डॅनियल व्हिटोरीच्या (Daniel Vettori) गोलंदाजीवर केल्या होत्या. न्यूझीलंडला ‘सुपर ओव्हर’मध्ये मात्र २ बाद केवळ १५ धावाच करता आल्या होत्या. अशाप्रकारे हा सामना विंडीजने जिंकला होता. आणि ‘सुपर ओव्हर’मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मानही आपल्या नावावर केला होता.
२. भारत
भारत आणि न्यूझीलंड संघातील ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील ३रा सामना हॅमिल्टनच्या मैदानावर खेळण्यात आला होता. त्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ५ बाद १७९ धावा केल्या होत्या.
भारताने दिलेल्या १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला शेवटच्या षटकात केवळ ९ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यांना केवळ ८ धावाच करता आल्या होत्या. अशाप्रकारे सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये गेला होता. त्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत २० धावा करत सामना आपल्या नावावर केला होता.
३. वेस्ट इंडीज
टी२० विश्वचषक २०१२मध्ये वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड संघात खेळण्यात आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीज संघाने सर्वबाद १३९ धावा केल्या होत्या. विंडीजच्या या लहान आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला शेवटच्या सामन्यात विजयासाठी केवळ २ धावांची आवश्यकता होता. परंतु न्यूझीलंडचा फलंदाज डग ब्रेसवेलला केवळ एकच धाव घेता आली आणि दुसरी धाव घेतेवेळी तो धावबाद झाला. त्यानंतर सामना बरोबरीत सुटला आणि दोन्ही संघात ‘सुपर ओव्हर’ घेण्यात आली.
त्या दरम्यान वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी ६ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ६ चेंडूत केवळ १७ धावा केल्या. अशाप्रकारे या रोमांचक सामन्यात वेस्ट इंडीजने १ धावेने विजय मिळविला होता.
सर्वाधिक वाचलेले लेख-
-बापरे! ६४ कोटी रुपये खर्च करुन युवराज झाला ‘या’ खेळाडूचा शेजारी, ज्याने…
-वनडेत सर्वाधिक वेळा नर्वस नाइंटीजचे शिकार झालेले ५ भारतीय, तिसरे नाव आहे विशेष
-वनडे सिरीजमध्ये षटकारांचा पाऊस पाडणारे ५ खेळाडू, चौथे नाव आहे खास