---Advertisement---

आयपीएल प्लेऑफ सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना ‘या’ तीन संघांनी रोवलाय अटकेपार झेंडा, वाचा सविस्तर

On: बुधवार, मे 25, 2022 8:48 PM
Gujarat-Titans-IPL
---Advertisement---

सन २००८मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) यंदा पंधरावे वर्ष आहे. या लीगचा सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सचे नाव घेतले जाते. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० असे पाच वेळा आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

लीगचा विजेता होणे हे काही सोपे नाही. आधी त्या संघाला साखळी फेरीतील सर्वाधिक सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये स्थान मिळवणे गरजेचे असते. नंतर प्लेऑफमध्ये पुढे जाऊन मग अंतिम सामना जिंकणे आवश्यक असते. जर एखादा संघ चौथ्या स्थानावर असेल, तर त्याला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी पहिले एलिमिनेटर आणि नंतर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात विजय मिळवावा लागतो.

अशातच जर प्लेऑफच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक लक्ष्य असेल, तर सामना अधिकच रंगतो. कारण, टी२० क्रिकेट प्रकारामध्ये सर्वच संघांना तुफानी फलंदाजी करून समोरच्या संघावर दबाब आणायचा असतो, पण काही वेळेला काही संघ फलंदाजी करताना त्या मोठ्या धावांचा डोंगर सहज पार करतात. अशातच आयपीएलमध्ये प्लेऑफच्या सामन्यात सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करून तो सामना जिंकणे आतापर्यंत फक्त तीनच संघांना जमले आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (२४ मे, २०२२)
आयपीएल २०२२मध्ये दहा संघ खेळत आहेत. यामध्ये पदार्पणाच्या हंगामातच गुजरात संघाने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. क्वालिफायर सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत जोस बटलरच्या ८९ धावा आणि कर्णधार संजू सॅमसनच्या ४७ धावाच्या जोरावर १८८ धावांचा डोंगर उभारला होता.

ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने १८९ धावांच्या लक्षाचा यशस्वी पाठलाग सात विकेट आणि तीन चेंडू राखून केला. यामध्ये डेविड मिलरने ३८ चेंडूत ६८ धावांची झंझावाती खेळी करत संघाच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (२७ मे, २०१२)
आयपीएल २०१२चा हा अंतिम सामना कोणीच विसरणार नाही. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सुरेश रैना (७३ धावा), मायकल हसी (५४ धावा) आणि मुरली विजयच्या ४२ धावांच्या खेळीवर कोलकातासमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले.

आपले पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी आतूर असलेल्या कोलकाताने या लक्षाचा यशस्वी पाठलाग केला. यावेळी सलामीवीर मनविंदर बिस्लाने ४८ चेंडूत ८९ धावा केल्या. जॅक कॅलिसनेही ६९ धावा करत त्याला योग्य साथ दिली. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने हा सामना पाच विकेट आणि दोन चेंडू राखत जिंकत चेन्नईचे सलग तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंग केले होते.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (१ जून, २०१४)
कोलकाताने आयपीएलच्या सातव्या हंगामात चमकदार कामगिरी करत दुसऱ्यांदा आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएल २०१४च्या या अंतिम सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

जॉर्ज बेलीच्या कर्णधारपदाखाली खेळणाऱ्या पंजाबने मनन वोहराच्या ६७ धावा आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या नाबाद शतकीय खेळीवर कोलकातासमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले होते. कोलकाताच्या मनीष पांडेने ५० चेंडूत सात चौकार आणि सहा षटकाराच्या मदतीने ९४ धावा केल्या. हा महत्वपूर्ण सामना कोलकाताने तीन विकेट्स आणि तीन चेंडू राखत जिंकला.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

बाबो! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या ऍलिस्टर कूकवर १५ वर्षीय पोरगा भारी, असा केला करेक्ट कार्यक्रम

सुंदर साडी अन् नाकात नथ, मराठमोळ्या अंदाजात खूपच देखणी दिसतेय सचिनची लाडकी लेक, पाहा फोटो

आयपीएल २०२२च्या फायनलमध्ये दिमाखात पोहोचली नवखी टीम गुजरात टायटन्स, ‘या’ खेळाडूंचे आहे मोलाचे योगदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---