fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कसोटीत विक्रमांचा रतीब घालणाऱ्या ‘या’ ३ दिग्गजांना कधीही मिळाली नाही आयपीएलमध्ये संधी

3 Test Bowlers Never Played In IPL

August 27, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही क्रिकेट जगतातील केवळ प्रतिष्ठित व सर्वाधिक लोकप्रिय लीग आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रसिद्धीबरोबर चिक्कार पैसाही मिळतो. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. शेन वॉर्नपासून ते सचिन तेंडूलकरपर्यंत अनेक दिग्ग्गज आयपीएलमध्ये खेळताना दिसले.

२० षटकांच्या या लीगमध्ये फलंदाज कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर गोलंदाजही कमीत कमी धावा देत जास्तीत जास्त विकेट्सची नोंद आपल्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करतात. वनडे आणि टी२० या मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात खेळण्याचा अनुभव असलेल्या खेळाडूंसाठी आयपीएल खेळणे जास्त कठीण जात नाही. पण, कसोटीसारख्या अमर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये खेळणे आव्हानात्मक ठरते.

असे असले तरी, अनेक दिग्गज कसोटीपटूंनी आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये अनेक शानदार विक्रम करणाऱ्या ३ दिग्गज खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याचं सौभाग्य लाभलं नाही. या लेखात, त्या ३ खेळाडूंची माहिती देण्यात आली आहे.

आयपीएल न खेळलेले कसोटीतील तीन दिग्गज गोलंदाज (3 Test Bowlers Never Played In IPL) –

नेथन लायन – Nathan Lyon

ऑस्ट्रेलियाचा दमदार फिरकीपटू गोलंदाज नेथन लायन याला आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. एवढेच नाही तर आतापर्यंत कोणत्याही संघाने आयपीएल लिलावात त्याच्यावर बोलीदेखील लावली नाही.

कसोटीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या लायनने केवळ ९६ कसोटी सामन्यात ३९० विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. यात त्याच्या ५० धावा देत ८ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे. असे असले तरी, ऑस्ट्रेलियाकडून मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. त्याने वनडेत आतापर्यंत २९ सामने खेळले आहेत. तर, टी२० केवळ २ सामने खेळले आहेत.

स्टुअर्ट ब्रॉड – Stuart Broad

इंगलंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने नुकत्याच त्याच्या कसोटीतील ५०० विकेट्स पूर्ण करत, अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याची कसोटीतील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्याची वनडे आणि टी२० क्रिकेटमधील आकडेवारीही चांगली आहे. वनडेत त्याने १२१ सामन्यात १७८ विकेट्स घेतल्या आहेत. तर, ५६ टी२० सामन्यात ६५ विकेट्स घेतल्या आहेत.

पण आतापर्यंत त्याला आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. २०११मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाने त्याला विकत घेतले होते. पण, त्याला पूर्ण हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

 जेम्स अँडरसन – James Anderson

कसोटी क्रिकेटमध्ये ६०० विकेट्स घेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मोठमोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. कसोटीत ६०० विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज झाला आहे. शिवाय वनडेत त्याच्या नावावर २६९ विकेट्सची नोंद आहे. पण, अँडरसनला इंग्लंडकडून जास्त टी२० सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.

२००७साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२०त पदार्पण करणाऱ्या अँडरसनने २००९मध्ये त्याचा शेवटचा टी२० सामना खेळला होता. दरम्यान त्याने केवळ १९ सामने खेळत १८ विकेट्स घेतल्या आहेत. कदाचित या कारणामुळेच त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नसावी.


Previous Post

प्रेग्नंसीची बातमी गुप्त ठेवण्यासाठी विराट-अनुष्काचे होते असे नियोजन

Next Post

वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@mipaltan
IPL

DC vs MI : नवख्या पंतसमोर अनुभवी रोहितचे आव्हान, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Next Post

वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी

मला कोणतीही जबाबदारी द्या मी ती शंभर टक्के पूर्ण करतो - अजिंक्य रहाणे

एमएस धोनीचे आयपीएलमधील ३ शानदार विक्रम, ज्यांच्या आसपासही नाही कुणी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.