आयपीएल २०२२ संपल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मायदेशात टी-२० मालिका खेळली जाणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. अशात चालू आयपीएल हंगामात जबरदस्त प्रदर्शन केलेल्या काही युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. आपण या लेखात भारताच्या अशाच काही खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांनी चालू आयपीएल हंगामात चांगले प्रदर्शन केले आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघासाठी खेळू शकतात.
१. उमरान मलिक –
सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) काही दिवसांपासून जाणकारांच्या नजरेत आला आहे. उमरानने आयपीएल २०२२ मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याची कामगिरी केली आहे. तो १५० किमीच्या ताशी वेगाने निरंतर गोलंदाजी करू शकतो.
चालू हंगामात त्याने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरीने २४.६५ राहिली आहे, तर इकोनॉमी रेट ८.८० राहिला आहे. काही सामन्यांमध्ये तो संघासाठी महागात पडला आहे, पण त्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणे शक्य नाहीये. तो भारतीय संघासाठी आतापर्यंतचा सर्वात वेगवान गोलंदाज बनू शकतो. अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
२. प्रसिद्ध कृष्णा –
भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत १२ सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत. राजस्थान रॉयल्सला सामना जिंकवून देण्यासाठी त्याने अनेकदा महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याची गोलंदाजी दिवसेंदिवस सुधारत आहे आणि त्यामुळेच निवडकर्त्यांचे लक्ष त्याने स्वतःकडे वेधले आहे.
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात देखील कृष्णाला खरेदी करण्यासाठी अनेक संघांनी प्रयत्न केला, पण अखेर राजस्थानने बाजी मारली. कृष्णाने यापूर्वी भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. ७ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत. अशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला स्वतःचे आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करण्याची संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे.
३. पृथ्वी शॉ –
भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आयपीएल २०२२ मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिवसा. त्याने हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये २५९ धावा खर्च केल्या आहेत. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत आणि ३३९ धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील ६ सामन्यांमध्ये १८९ धावा केल्या आहेत.
शॉने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्येही पदार्पण केले आहे. पण या प्रकारात त्याला फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. नंतर खराब फॉर्ममुळे त्याला भारतीय संघातून वगळले गेले. पण आयपीएलच्या चालू हंगामातील त्याचे प्रदर्शन पाहून निवडकर्ते त्याला संघात संधी देतील, अशी शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वरिष्ठ खेळाडूंच्या गैरहजेरीत शॉला संधी मिळू शकते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एक लाजरा न साजरा मुखडा…! सारा तेंडूलकर बनली ‘राजकुमारी’, फोटोंवरून हटणार नाही तुमचीही नजर
मोठी बातमी! भारताची सुवर्ण इतिहासाला गवसणी, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’