क्रिकेटमध्ये सर्वात छोटा क्रिकेट प्रकार म्हणजे टी२०. अवघ्या २० षटकांच्या या खेळात फलंदाज तुफान फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडतात. याच क्रिकेट प्रकारात आणि त्यातही महिलांच्या एका क्रिकेट स्पर्धेत एक विक्रम रचला गेला आहे. ओमान सुरू असलेल्या येथे जीसीसी महिला टी२० स्पर्धेत २२ मार्च रोजी बहरीन संघाने सौदी अरेबियाविरुद्ध जबरदस्त धावसंख्येचा डोंगर उभा केला होता. त्यांनी केलेली धावसंख्या ही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून सौदी अरेबिया (Bahrain vs Saudi Arabia) संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना बहरीन संघाने अवघी १ विकेट गमावत ३१८ धावा ठोकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय महिला टी२० सामन्यात दुसऱ्यांदा कोणत्याही संघाने ३०० धावांचा आकडा पार केला. यापूर्वी २०१९मध्ये युगांडा संघाने मालीविरुद्ध २ विकेट्स गमावत ३१४ धावा केल्या होत्या.
🚨 Record alert 🚨
Bahrain broke Uganda's record score of 314 for 2 to go to the 🔝
Credits: Cricket Bahrain pic.twitter.com/RkcUP7t4Ek
— Women’s CricZone (@WomensCricZone) March 22, 2022
पुरुषांच्या टी२० क्रिकेट सामन्यात आतापर्यंत कोणत्याही संघाला ३०० धावांचा आकडा पार करता आला नाहीये. पुरुषांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या ही ३ विकेट्स गमावत २७८ धावा आहे. ही कामगिरी २०१९ साली अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध डेहराडूनमध्ये केली होती. जीसीसी महिला टी२० स्पर्धेत बहरीन संघाच्या विजयात ३८ वर्षीय दीपिका रसंगिकाने (Deepika Rasangika) चमकदार कामगिरी केली. तिने ६६ चेंडूत नाबाद १६१ धावांची आतिषी खेळी केली. या धावा करताना तिने ३१ चौकार ठोकले. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार थरंगा गजनायकेनेही ५६ चेंडूंचा सामना करताना नाबाद ९४ धावा ठोकल्या. तिने या धावा करताना १७ चौकार मारले. बहरीनच्या डावात एकूण ५० चौकार लगावण्यात आले.
🚨WORLD RECORD! 🚨
Deepika Rasangika became the highest run-scorer in women’s T20 cricket with 161 not out against Saudi Arabia.
The previous best was Alyssa Healy’s unbeaten 148.#CricketTwitter pic.twitter.com/yN2oRjRNS6
— Female Cricket (@imfemalecricket) March 22, 2022
पुरुषांच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऍरॉन फिंचचे (Aaron Finch) नाव आहे. त्याने २०१९मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १७२ धावांची खेळी केली होती.
बहरीनने दिलेल्या एवढ्या मोठ्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौदी अरेबिया संघाने ४० धावांवरच आपले ६ विकेट्स गमावल्या होत्या. पुढे त्यांचा संपूर्ण डाव ४९ धावांवरच संपुष्टात आला.
सौदी अरेबियाच्या गोलंदाजांची बहरीनच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. सौदी अरेबियाकडून मायरा खान सर्वात महागडी गोलंदाज ठरली. तिने ४ षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक ६८ धावा दिल्या. याव्यतिरिक्त इमान एजाजने ४ षटके गोलंदाजी करताना ६३ धावा दिल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
ग्लेन मॅक्सवेलचे लागले भारतीय पद्धतीने लग्न, वरमाळा घालतानाचा Video तुफान व्हायरल
RCBvsPBKS : बेंगलोरने फलकावर लावल्या २०५ धावा अन् तिथेच निश्चित झाला पराभव, वाचा सविस्तर
अर्रर्र, लईच वाईट झालं! मुंबईचा कर्णधार रोहितला दुहेरी धक्का, पहिली मॅच पण हरली आणि दंडही झाला