आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट
कोलकाता नाईट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफाईन रदरफोर्ड
क्वालिफायर 1 सामना जो संघ जिंकेल, तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर पराभूत संघ एलिमिनेटरच्या विजेत्यासोबत 24 मे रोजी सामना खेळेले. हा सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये दाखल होईल. सनरायझर्स हैदराबादनं प्रदीर्घ कालावधीनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. अशा स्थितीत ते विजेतेपदासाठी भरपूर जोर लावतील, यात शंका नाही. तर दुसरीकडे, केकेआरकडेही 2021 नंतर पहिल्यांदा अंतिम फेरीत जाण्याची संधी आहे.
आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये आतापर्यंत केकेआर आणि हैदराबाद तीन वेळा आमने-सामने आले आहेत. आज चौथ्या वेळेस हे दोन संघ एकमेकांशी भिडतील. प्लेऑफमध्ये हैदराबादची कामगिरी केकेआर पेक्षा उत्तम राहिली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता आणि हैदराबाद हे संघ 26 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये कोलकाताने 16 तर हैदराबादनं 9 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना अनिर्णित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळल्या गेलेल्या 3 तुफानी खेळी, ज्या चाहत्यांच्या आजही स्मरणात आहेत
आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी चेन्नई ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते, धोनीचं काय होणार?