मँचेस्टर। 3 जुलै, मंगळवारी भारताने इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने एक खास विश्वविक्रम केला आहे.
या सामन्यात धोनीने आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत 33 यष्टीचीत पूर्ण केले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक यष्टीचीत करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याने या यादीत पाकिस्तानच्या कामरान अकमलला मागे टाकले आहे.
धोनीने हे 33 यष्टीचीत 91 सामने खेळताना 90 डावात पूर्ण केले आहेत. अकमलने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 32 यष्टीचीत केले आहेत. तसेच त्याच्यापाठोपाठ या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद शेहजाद आहे.
धोनीने मंगळवारी झालेल्या या सामन्यात जॉनी बेअरस्टो आणि जो रुटला शुन्य धावेवर यष्टीचीत केले आहे.
यष्टीमागे झेल घेण्यातही धोनी अव्वल-
कॅप्टनकुल एमएस धोनी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये यष्टीमागे सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीतही अव्वल क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत 90 डाव खेळताना 49 झेल घेतले आहेत. त्यामुळे त्याने यष्टीचीत आणि झेल मिळून यष्टीमागे सर्वाधिक 82 विकेट घेतल्या आहेत.
तसेच धोनीने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 91 सामन्यात 36.37 च्या सरासरीने 1455 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक यष्टीचीत करणारे यष्टीरक्षक
33- एमएस धोनी (सामने-91)
32- कामरान अकमल (सामने-58)
28- मोहम्मद शेहजाद (सामने-63)
26- मुशफिकुर रहिम (सामने-71)
20- कुमार संगकारा (सामने-56)
महत्त्वाच्या बातम्या:
–डेव्हीड वार्नर पुन्हा कर्णधार पदी
–Video- या कारणामुळे फेडररला जगात चाहत्यांचे सर्वाधिक प्रेम मिळते
–भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर अडकली मोठ्या वादात