क्रिकेटटॉप बातम्या

स्टेडियममध्ये प्रपोज करून किस केलं, लाईव्ह मॅचदरम्यान जोडप्याचा रोमान्स व्हायरल; VIDEO पाहा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या प्रतिष्ठेची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेचा चौथा सामना मेलबर्न येथे सुरू आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगची देखील धूम चालू आहे. या लीगमधील सामन्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 26 डिसेंबरचा आहे. या व्हिडिओत स्टेडियममध्ये एक जोडपं बसलेलं दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला पुरुष महिलेला प्रपोज करतो. यानंतर महिलेच्या आनंदाला पारावार उरत नाही. ती त्याचं प्रपोजल स्वीकारते आणि ते दोघे एकमेकांना किस करतात. या दरम्यान आजूबाजूचे चाहते टाळ्या वाजवताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूजर्स यावर सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 311 धावा आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आतापर्यंत सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियासाठी पन्नास धावांचा आकडा ओलांडला.

भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 3 बळी घेतले आहेत. याशिवाय आकाशदीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी 1 यश मिळालं आहे. सध्या स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार पॅट कमिन्स नाबाद आहेत. स्मिथनं 68 धावा केल्या असून कमिन्स 8 धावा करून खेळत आहे.

हेही वाचा – 

“त्यांच्याशी हसून बोलू नको”, स्टंप माइकवर कोहलीचा सिराजला सल्ला, VIDEO व्हायरल
4,4,4,4,4,4….मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूने ओव्हरमध्ये ठोकले सलग 6 चौकार!
भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी किती चाहते आले? संख्या जाणून विश्वासच बसणार नाही!

Related Articles